Advertisement

दिवाळीच्या आधीचं बेस्टचं दिवाळं, बेस्टचा कारभार ठप्प होता होता बचावला

नियमानुसार बेस्टला बसच्या तिकीटावरील पोषण अधिभार (कर) वाहतूक आयुक्तांकडे जमा करावा लागतो. त्यानुसार तिकीटावरील १५ पैसे अधिभार वेळच्या वेळी वाहतूक आयुक्तांकडे जमा करणं बंधनकारक आहे. पण गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टने हा अधिभार वाहतूक आयुक्तांकडे भरलेला नाही.

दिवाळीच्या आधीचं बेस्टचं दिवाळं, बेस्टचा कारभार ठप्प होता होता बचावला
SHARES

आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टचं दिवाळीच्या आधीच दिवाळी निघालं आहे. प्रवासी कराचे ५०० रूपये थकवलेल्या बेस्टची ३ बँक खाती मुंबई शहराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गोठवली. बँक खातीच गोठवल्याने बेस्टचा कारभारच ठप्प होण्याची मोठी भीती निर्माण झाली होती. पण बेस्ट प्रशासन आणि बेस्ट समितीने तात्काळ परिवहन मंत्र्यांकडे धाव घेत यासंबंधीच्या कारवाईवर स्थगिती आणली आणि बेस्टचा कारभार ठप्प होता होता बचावला.


कशी मिळाली स्थगिती?

नियमानुसार बेस्टला बसच्या तिकीटावरील पोषण अधिभार (कर) वाहतूक आयुक्तांकडे जमा करावा लागतो. त्यानुसार तिकीटावरील १५ पैसे अधिभार वेळच्या वेळी वाहतूक आयुक्तांकडे जमा करणं बंधनकारक आहे. पण गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टने हा अधिभार वाहतूक आयुक्तांकडे भरलेला नाही.


अधिभाराची डोकेदुखी

बेस्टने २०१० पासून हा अधिभार थकवल्याने ८ वर्षांमध्ये अधिभाराच्या रूपाने ५०० कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. या थकबाकीमुळे बेस्ट अडचणीत आल्याने तिकीटावरील पोषण अधिभाराचा भार दूर करावा, या अधिभारातून बेस्टला मुक्त करावं अशी मागणी गेल्या काही वर्षापासून बेस्टकडून राज्य सरकारकडे करण्यात येत आहे. पण राज्य सरकारनं त्यांच्या या मागणीवर अद्याप लक्ष न दिल्यानं थकबाकीची डोकेदुखी वाढल्याचं चित्र आहे.


विशेषाधिकारत स्थगिती

आपल्या अधिकारात थकबाकीची वसुली करता येत नसल्याचं म्हणत वाहतूक आयुक्तांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार बेस्टची खाती गोठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एस. आर. जोंधळे, जिल्हाधिकारी, मुबंई शहर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. बँक खाती गोठवल्याबरोबर बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबुरकर आणि इतरांनी परिवहन मंत्र्यांना साकडं घातलं. मंत्र्यांनी आपल्या अधिकारात या कारवाईला तातडीनं स्थगिती दिली आणि त्यामुळं बेस्टवरील मोठी नामुष्की दूर झाल्याची माहिती बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी दिली.


परवानगीनेच व्यवहार

परिवहन मंत्र्यांनी या कारवाईला स्थगिती दिल्याने आता बेस्टला आर्थिक व्यवहार करता येणार असल्याचंही गणाचार्य यांनी सांगितलं आहे. तर या अधिभारातून बेस्टला मुक्ती देण्याचीही मागणी आता बेस्ट आणि बेस्ट समितीकडून उचलून धरली जात आहे. दरम्यान बँक खाती अजूनही सील असून बेस्टला आमच्या परवानगीशिवाय कोणताही व्यवहार करता येणार नसल्याचं म्हणत जोंधळे यांनी अजूनपर्यंत कारवाईला स्थगिती दिल्याची आदेश आपल्यापर्यंत आले नसल्याचंही 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं आहे. तसे आदेश आल्याबरोबर कारवाई स्थगिती करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा-

दिवाळीत बेस्टच्या १५४ जादा गाड्या

बोनससाठी गुरूवारपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा