Advertisement

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक


रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
SHARES

मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रविवार ३ जून रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तिन्ही रेल्वे मार्गांवरील सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर अाणि रुळांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी प्रवाशांना या ब्लॉकचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.


पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी १०.३५ पासून ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सांताक्रूझ ते गोरेगावपर्यंत अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान सर्व जलद लोकल सांताक्रूझ ते गोरेगावपर्यंत धीम्या मार्गावर चालवल्या जातील. काही लोकल रद्द केल्या जाणार आहेत.


हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी ११.०० वाजल्यापासून ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रेपर्यंत अप आणि डाऊन मार्गांवर मेगाब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान कुर्ला ते पनवेल विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. तर वडाळा ते पनवेल, बेलापूर आणि वाशीपर्यंत धावणाऱ्या लोकल सेवा सकाळी ११.३४ वा. पासून ते दुपारी ४.४७ वा. पर्यंत खंडित राहतील. पनवेल, बेलापूर आणि वाशीपासून ते सीएसएमटीपर्यंत धावणाऱ्या लोकल सेवा सकाळी ९.५३ पासून ते दुपारी ३.२० पर्यंत खंडित राहतील.


मध्य रेल्वे

मध्य रेल्वे मार्गावर सकाळी ११.२० वाजल्यापासून ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकदरम्यान माटुंगाहून सुटणाऱ्या सर्व धीम्या लोकल सकाळी १०.५७ वाजल्यापासून ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत मुलुंड स्थानकापर्यंत डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील.

कल्याणहून सुटणाऱ्या सर्व अप जलद मार्गावरील लोकल सकाळी १०.५४ वाजल्यापासून ते दुपारी ३.०६ वाजेपर्यंत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांत थांबणार आहेत. तसेच, सीएसएमटीहून सुटणाऱ्या सर्व डाऊन जलद लोकल सकाळी १०.४८ वाजल्यापासून ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकांवर थांबतील.


हेही वाचा -

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचं गिफ्ट

झाडाची फांदी अंगावर पडून ९१ वर्षीय महिलेचा मृत्यू

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा