Advertisement

मिनी एसी बसचा प्रस्ताव फेटाळला


मिनी एसी बसचा प्रस्ताव फेटाळला
SHARES

मुंबईची लाईफ लाईन ओळखली जाणारी बेस्ट बस सध्या आर्थिक तोट्यात आहे. त्यातच सोमवारी 17 तारखेला झालेल्या बेस्ट समिती बैठकीत बेस्टच्या साध्या आणि वातानूकलित बसेस अश्या दोन्ही प्रकारच्या बसेस खाजगी संस्थेकडून भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

हा प्रस्ताव उशिरा आणल्याने आणि एसी गाड्यांचा प्रस्ताव टेंडर न काढताच सादर करण्यात आल्याने बेस्टच्या समिती सदस्यांनी फेरविचार करण्यात यावा म्हणून हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवला आहे.

यावेळी, सुनील गणाचार्य यांनी आक्षेप घेत सांगितले की, जुन्या एसी बसेस भंगारात काढण्याची परवानगी दिली नसताना देखील प्रशासनाने बसेस भंगारात काढल्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचा उल्लेख प्रस्तावात आहे. जर, प्रशासन निर्णय घेणार असेल तर बेस्ट समितीची गरजच काय? विनाकंडक्टर धावणाऱ्या या बसेसमध्ये आरएफआयडी कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांनाच प्रवास करता येणार का? ड्रायव्हरच कंडक्टरचे काम करणार का? याबाबत मान्यताप्राप्त युनियनची परवानगी घेतली का? खाजगी गाड्या या बेस्टच्या आगारता उभे राहणार का? तसेच, त्यावर काम करणारे खाजगी कंपनीचे कर्मचारी हे देखील आगारात ये-जा करणार का? आणि, जर त्यामुळे काही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न रवी राजा आणि सुनिल गणाचार्य यांनी उपस्थित केले. अखेर, यावर विचार करत अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी प्रस्ताव फेरविचारसाठी प्रशासनाकडे पुन्हा पाठवला आहे. 

बेस्ट समितीमध्ये ५० साध्या बसेस खाजगी संस्थेकडून घेण्याचा प्रस्ताव सादर झाला होता. हा प्रस्ताव एका वर्षाने आणल्यामुळे तेव्हा आणि आताच्या दरात तफावत आहे. सध्या जीएसटी लागू झाल्यामुळे नव्या दराप्रमाणे किती खर्च येणार याची माहिती समितीला सादर करावी. बेस्टने जर स्वत बस चालवल्यावर जेवढा खर्च होणार आहे त्याहीपेक्षा जास्त खर्च हा खाजगी बसेसमुळे होणार याचा विचार प्रशासनाने करावा तर खाजगी बस चालवल्यावर होणारा छुपा खर्च किती याची देखील सविस्तर माहिती समितीला सादर करावी. तर खासगी बसेसमध्ये कंडक्टर नसल्याने याची माहिती कर्मचारी युनियनला द्यावी अश्या मागण्या बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत, सुनील गणाचार्य आणि रवी राजा यांनी केल्या.

बेस्ट बसला ला होणा-या खर्चापेक्षा खाजगी बसेसला जास्त खर्च होणार नाही, असे बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बगाडे यांनी सांगितले. यात काही बदल करायची देखील तयारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा