Advertisement

बेस्टला मिळणार 4 कोटी, कामगारांच्या पगाराचा प्रश्न सुटणार?


बेस्टला मिळणार 4 कोटी, कामगारांच्या पगाराचा प्रश्न सुटणार?
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून बेस्ट तोट्यात जात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सुटेनासा झाला आहे. यावर उपाय म्हणून देवनारमधील शिवाजीनगर येथील बस आगाराची जागा भाड्याने देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे.


जागा कोणाला देणार भाड्याने?

मुंबई महानगरपालिकेकडून घाटकोपर ते चेंबूर लिंक रोडपर्यंतच्या उड्डाणपुलासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराला कास्टिंग गार्डसाठी शिवाजीनगर आगाराची जागा 30 महिन्यांच्या कालावधीसाठी दिली जाणार आहे.


गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी

बेस्टच्या शिवाजीनगर येथील बस आगाराची जागा भाड्याने देण्याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. सुनील गणाचार्य यांनी गुरुवारी या ठिकाणी पाहणी केल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्याचे मत मांडले. हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर सोमवारी पाहणी दौरा आयोजित करण्याचे निश्चित केले आणि बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी निर्णय घेत हा प्रस्ताव मंजूर केला.


बेस्टला 4 कोटी मिळणार

79,986 चौ. मी. च्या भूखंडावर शिवाजीनगर आगार आहे. तसेच कर्मचारी वसाहत वगळल्यास येथे 26 हजार 29 चौ. मी. जागा रिक्त पडून आहे. महानगरपालिकेकडून घाटकोपर ते चेंबूर लिंक रोडपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. पालिकेने या उड्डाणपुलाचे बांधकाम मेसर्स जेएमसी लि. या कंपनीकडे सोपवले आहे. 

आता या कंपनीने बांधकामासाठी कास्टिंग गार्ड म्हणून ही जागा भाडे तत्वावर देण्याची मागणी केली. तसा प्रस्तावही गुरुवारी झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला. ज्याला आता मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे बेस्टला 4 कोटी 21 लाख रुपये भाडे मिळेल.


'पाहणी नंतरच प्रस्तावाला मंजुरी'

'आधी पाहणी करा, मगच प्रस्तावाला मंजुरी द्या' असे म्हणत भाजपाचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी विरोध केला. पण आगाराची ही जागा मोकळी आहे, या जागेचा वापर बस आगारासाठी होत नाही, ती रिक्त पडून आहे. जर ही जागा भाड्याने दिली तर, आपल्याला 4 कोटी 21 लाख रुपये भाडे मिळेल आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारचा प्रश्नही सुटेल त्यामुळे प्रस्ताव मंजूर करुन नंतर पाहणी करावी अशी सूचना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. त्यानंतर बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.  


ही जागा विशिष्ट कालावधीसाठी भाड्याने देण्यात येणार आहे. प्रति चौ. मी. 40 रुपये दराने भाड्याने जागा मागितली होती. पण भाडे 139 रुपये करुन ही जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

- सुरेंद्रकुमार बागडे, बेस्ट महाव्यवस्थापक




हे देखील वाचा - 

आता मुंबईकरांसाठी ओलाची 'एसी' बस, बेस्टचं काय होणार?

मुंबईकर म्हणतात 'बेस्टपेक्षा टॅक्सीच बरी!'


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा