मोनोच्या ताफ्यात दाखल होणार आणखी १० लोकल

मोनो रेल्वेच्या सेवेमध्ये सुधारणा करण्याचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (एमएमआरडीए) ठरविलं आहे. मोनोच्या स्थानकांवर मोनोच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ व्हावी, यासाठी आणखी १० मोनो विकत घेण्याचा निर्णय एमएमआरडीए प्राधिकरणानं घेतला आहे.

SHARE

मुंबईत सुरू झालेल्या मोनो रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. त्यामुळं प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता मोनो रेल्वेच्या सेवेमध्ये सुधारणा करण्याचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (एमएमआरडीए)  ठरविलं आहे. मोनोच्या स्थानकांवर मोनोच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ व्हावी, यासाठी आणखी १० मोनो विकत घेण्याचा निर्णय एमएमआरडीए प्राधिकरणानं घेतला आहे. त्यासाठी येत्या आठवडाभरात निविदा काढण्यात येणार आहेत.


१० मोनो विकत घेणार 

मोनोरेल्वेच्या वडाळा ते चेंबूर या पहिल्या आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्प्यावर मोनोरेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ होण्यासाठी एमएमआरडीए आणखी १० मोनो विकत घेणार आहे. सद्यस्थितीत या मार्गावर ४ मोनो धावत आहेत. त्यामुळं या मार्गावरील प्रवाशांना प्रवासासाठी  २० ते २५ मिनिटं मोनोची वाट पाहत स्थानकात उभं राहावं लागतं. मात्र, मोनोच्या ताफ्यात आणखी मोनो आल्यास, या फेऱ्यांची संख्या वाढणार आहे.


एकूण ७ मोनो

त्याशिवाय बंद असलेल्या तीन मोनो रेल्वेची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळं येत्या ३ महिन्यांत या मोनोही मोनोरेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या मोनो दाखल झाल्यास या मार्गावर एकूण ७ मोनो धावतील. सध्या आचारसंहिता सुरू असल्यानं मोनोसाठी एमएमआरडीए प्राधिकरणाला निविदा काढता येत नव्हत्या. मात्र, २३ मेला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही निविदा प्रक्रिया एमएमआरडीए प्राधिकरणातर्फे राबविण्यात येणार आहे.हेही वाचा -

आरे रोड येथील मिठी नदीवरून जाणारा पूल धोकादायक

दर शनिवार व रविवारी रात्री बेस्टच्या सीएनजी बसची तपासणीसंबंधित विषय
ताज्या बातम्या