Advertisement

मोदी सरकार IRCTC मधील २० टक्के हिस्सा विकणार

मोदी सरकारनं आयआरसीटीसीमधील २० टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

मोदी सरकार IRCTC मधील २० टक्के हिस्सा विकणार
SHARES

मोदी सरकारनं आयआरसीटीसीमधील २० टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कंपनीमधील २.४ कोटी शेअर्सची विक्री सरकार ऑफर ऑफ सेलद्वारे करेल. त्याचबरोबर जास्त सबस्क्रिप्शन झाल्यास ८० लाख अतिरिक्त शेअर्सची विक्री करण्याचा प्रस्ताव सरकारनं ठेवला आहे.

सरकारचे आयआरसीटीसीमध्ये ३.२ कोटी शेअर आहेत. १० आणि ११ डिसेंबर २०२० ला स्टॉक एक्सचेंजच्या स्वतंत्र विंडोद्वारे आयआरसीटीसीच्या शेअर्सची विक्री केली जाईल, असं केंद्रानं म्हटलं आहे. फक्त किरकोळ गुंतवणूकदारांनाच ११ डिसेंबरला शेअर्ससाठी अर्ज करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. त्याची फ्लोर किंमत सरकारनं १ हजार ३६७ रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.

आयआरसीटीसीच्या बुधवारी बंद झालेल्या किंमतीपेक्षा १६ टक्के कमी केंद्रानं निश्चित केलेली फ्लोर किंमत आहे. म्हणजेच १६ टक्के सवलतीच्या किंमतीसह गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळेल. दरम्यान, बुधवारी कंपनीचे शेअर्स १६१८.०५ रुपयांच्या किंमतीवर बंद झाले होते.

३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीदरम्यान आयआरसीटीसीचा निव्वळ नफा ६७.३ टक्क्यांनी घसरून ३२.६३ कोटी रुपये झाला होता. याच कालावधीत गेल्या वर्षी कंपनीचा निव्वळ नफा ९९.८२ कोटी होता. तसंच, आयआरसीटीसीच्या आपरेशन्समुळे महसूलमध्ये ८३ टक्के घट सप्टेंबर २०२० च्या तिमाहीमध्ये झाली आणि ती ८८ कोटी रुपये झाली.

दरम्यान, आयआरसीटीसी ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे, जी रेल्वे मंत्रालयांतर्गत कार्यरत आहे. ही कंपनी कॅटरिंग सर्व्हिसच्या व्यतिरिक्त ऑनलाइन रेल्वेची तिकिटे आणि बाटली बंद पाणी देखील पुरवते.



हेही वाचा

सर्वसामान्यांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत लोकल ट्रेन बंदच

'या' कामासाठी कल्याण ते कर्जत लोकल रद्द

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा