Advertisement

मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशाचे प्राण


मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशाचे प्राण
SHARES

बुधवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास शुद्ध हरपल्यामुळे ६० वर्षीय प्रवाशी प्लॅटफाॅर्म क्रमांक २ वरून थेट ट्रॅकवर कोसळला. तेवढ्यात मुलुंड स्थानकांत ट्रेन दाखल होत होती. पण मोटरमनचं त्याकडे लक्ष गेलं अाणि त्यानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे ६० वर्षीय प्रवाशाचे प्राण वाजवण्यात यश अालं.


काय घडलं?

भरत चव्हाण हे मुलुंडच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून चालत असताना अचानक खाली ट्रॅकवर कोसळले. डोबिंवलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी ट्रेन मुलुंड स्थानकांत प्लॅटफॉर्म नंबर २ वर येणार होती. पण तेवढ्यात मोटरमननं प्रसंगावधान दाखवत तत्परतेने ट्रेन थांबवली. अन्य प्रवाशांनी चव्हाण यांना प्लॅटफाॅर्मवर उचलले. त्यामुळे प्रवाशी अाणि मोटरमन यांच्या तत्परतेमुळे भरत चव्हाण यांनी जीवदान मिळाले, अशी चर्चा प्रवाशांमध्ये होती.


मोटरमनचं सर्वत्र कौतुक

रेल्वे पोलिसांनी या प्रवाशाला ताब्यात घेतले असून त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्या प्रवाशाला नंतर त्यांच्या ताब्यात देण्यात अाले, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. प्रवाशाचे प्राण वाचवणाऱ्या मोटरमनचं मात्र सर्वत्र कौतुक होत होतं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा