Advertisement

बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई करा- अरविंद सावंत

वाहतुकीची शिस्त सर्वांनीच पाळली पाहिजे, त्यामुळे बेशिस्त दुचाकीस्वार आणि रस्त्यावर कुठेही अनधिकृत पार्किंग करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करावी

बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई करा- अरविंद सावंत
SHARES

वाहतुकीची शिस्त सर्वांनीच पाळली पाहिजे, त्यामुळे बेशिस्त दुचाकीस्वार आणि रस्त्यावर कुठेही अनधिकृत पार्किंग (illegal parking) करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करावी. रस्त्यावर एकेरी वाहतूक घोषित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे स्पष्ट निर्देश रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत (arvind sawant) यांनी दिले. रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार दुसरी बैठक अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार अजय चौधरी, आमदार यामिनी जाधव, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी राजीव निवतकर उपस्थित होते.

यावेळी अरविंद सावंत म्हणाले, मुंबई शहरामध्ये पार्किंगची समस्या अत्यंत गंभीर आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट, बृहन्मुंबई महापालिका, बेस्ट यांनी पार्किंसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास समस्या नक्कीच कमी होईल. मुंबईतील वाहनांची (traffic in mumbai) वाढती संख्या लक्षात घेता जुनी वाहने निर्लेखित करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता राज्य रस्ता सुरक्षा परिषदेस कळविण्यात यावं. 

हेही वाचा- मुंबईतील फेरीवाल्यांचं पुन्हा सर्वेक्षण

तसंच रस्त्याचं बांधकाम करताना अथवा रस्त्यावर एकेरी वाहतूक घोषित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा. जडवाहन वाहतूक बंदीची निश्चित वेळ पाळण्यासाठी अधिक कडक अंमलबजावणी करावी. कचरा नेणारी महापालिकेची वाहने यांनी सकाळी ८ पुर्वी अथवा रात्री ८ नंतर कचरा उचलण्याची कामे करावी. आय.आय.टी.च्या विद्यार्थ्यांनी प्रदूषण कमी करण्याकरिता तयार केलेलं उपकरण वाहन प्रदूषण कमी करण्याकरिता वापरण्यात येऊ शकते का याची पडताळणी करावी, असे निर्देश अरविंद सावंत यांनी दिले.

शहरातील विविध भागांमध्ये विशिष्ट दिवस हा सायकल दिवस म्हणून राबविण्यात यावा जेणेकरून वाहतुकीची व प्रद}षणाची समस्या कमी करण्यास मदत होईल, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुचवलं.

बैठकीमध्ये मुंबई शहरातील वाढते अपघात यांची कारणमीमांसा करून अपघात कमी करण्याकरिता विस्तृत चर्चा करण्यात आली. उपस्थित आमदार व अधिकाऱ्यांनी वाहतूक समस्येबद्दल सविस्तर चर्चा केली. बैठकीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे तसेच वाहतूक पोलीस, मुंबई पोर्ट ट्रस्ट, बेस्ट, म्हाडा, जे.जे.हॉस्पिटल, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण बृहन्मुंबई महानगरपालिका, एम.एस.आर.डी.सी. व प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) या विभागातील अधिकारी उपस्थित होते. (mp arvind sawant held a meeting on traffic and illegal parking in mumbai)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा