Advertisement

मनोज कोटक यांची भांडुप आणि विक्रोळी प्रवाश्यांसाठी रेल्वे मंत्रालयाकडे 'ही' मागणी

मुंबई ईशान्यचे भाजपा खासदार मनोज कोटक यांनी अलीकडेच भांडुप आणि विक्रोळी प्रवाश्यांसाठी रेल्वे मंत्रालयाकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.

मनोज कोटक यांची भांडुप आणि विक्रोळी प्रवाश्यांसाठी रेल्वे मंत्रालयाकडे 'ही' मागणी
SHARES

मुंबई ईशान्यचे भाजपा खासदार मनोज कोटक यांनी अलीकडेच भांडुप आणि विक्रोळी प्रवाश्यांसाठी रेल्वे मंत्रालयाकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.

कोटक यांनी यापूर्वी मंत्रालयाला सर्व नागरिकांसाठी मुंबई लोकल सुरू करण्यास सांगितलं होतं. आतापर्यंत, मुंबई लोकल फक्त बँकर्स, आरोग्य सेवा कर्मचारी, सरकारी अधिकारी इत्यादी आवश्यक सेवांसाठी कार्यरत आहे. 

भाजपा खासदाराचं म्हणणं आहे की, भांडुप आणि विक्रोळीमध्ये मोठ्या प्रमाणात सराकारी नोकरवर्ग आहे. या दोन स्थानकांवर रेल्वे सेवा नसल्यानं त्यांना बस किंवा खाजगी वाहनातून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे मंत्रालयानं या दोन स्थानकांवर देखील गाड्यांना थांबायला परवानगी दिली पाहिजे.

भांडुप आणि विक्रोळीच्या स्थानकांवरील थांबाविषयी कोटक पुढे म्हणाले की, लॉकडाऊनपासून अत्यावश्यक सेवेत असलेले भांडुप आणि विक्रोळीतील कर्मचारी नागरिकांसाठी अथक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जर ही मागणी मान्य झाली तर त्यांच्यासाठी हे सोयीस्रक ठरू शकते. 

तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आवश्यक सेवांमध्ये व्यस्त असलेल्या लोकांसाठी स्थानिक सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन करण्यापूर्वी मुंबईतील लोकलमध्ये साधारणत: १ हजार २०० प्रवासी सहजपणे प्रवास कर असत. पण आता राज्य सरकारच्या नियमांनुसार प्रत्येक ट्रेनमध्ये फक्त ६०० ते ७०० लोकांना प्रवास करण्याची परवानगी आहे. शिवाय गर्दीच्या वेळी जास्त गर्दी होऊ नये आणि सर्व सामाजिक अंतरांचे नियम पाळले जावेत यासाठी रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.हेही वाचा

पूर्ण क्षमतेने वाहतुक सेवा सुरु केल्यानंतर एसटीच्या प्रवाशी संख्येत वाढ

कोकण रेल्वेमार्गावर आता नियमितपणे धावणार दादर-सावंतवाडी विशेष गाडी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय