Advertisement

राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये एसटी सेवा पूर्ववत

फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येणारी एसटी सेवा सोमवारपासून राज्यातील ३३ जिल्ह्यांत सर्वसामान्यांसाठी सुरू झाली.

राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये एसटी सेवा पूर्ववत
SHARES

मुंबईसह राज्यभरात (maharashtra) वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं मुंबईतील वाहतूक सेवेतून सर्वसामान्यांचा प्रवास थांबला. मात्र सोमवरपासून राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळं फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येणारी एसटी सेवा सोमवारपासून राज्यातील ३३ जिल्ह्यांत सर्वसामान्यांसाठी सुरू झाली. तर सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मात्र एसटी सेवेसाठीचेही निर्बंध कायम आहेत.

राज्यात १ जूनपासून केवळ दीड हजार एसटी बसच अत्यावश्यक सेवांसाठी धावत होत्या. या बसच्या सहा हजार फे ऱ्यांमधून दररोज अडीच लाख प्रवासी प्रवास करत होते. त्यातून दररोज एक कोटी १५ लाख रुपये महसूल मिळत होता. सोमवारपासून एसटीची सेवा पूर्ववत झाली . ३३ जिल्ह्य़ांत एसटी प्रवाशांच्या सेवेत आली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे चार हजार बसच्या २४ हजार फेऱ्या झाल्या होत्या.

औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या सर्व विभागात मिळून ९४७ बस धावल्या. त्यापाठोपाठ नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगरमध्ये मिळून ८७५ बस, तर मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग या विभागात ५७७ बस चालवण्यात आल्या. एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या एसटी फेऱ्यांसाठी आगाऊ आरक्षण प्रणाली मंगळवार सकाळपासून कार्यरत होईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या २८३ पर्यंत पोहोचली आहे. तर एकू ण बाधित कर्मचाऱ्यांची संख्या ८ हजार ६५४ पर्यंत पोहोचली असून ४२२ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. ७ हजार ९४७ कर्मचारी उपचार घेऊन पुन्हा रुजू झाले आहेत.



हेही वाचा - 

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा, यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

लोअर परेल परिसरातील १५ झाडांवर कुऱ्हाड, अज्ञातांविरोधात पालिकेकडून गुन्हा दाखल


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा