Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती मागे!

वेतनवाढीच्या मुद्यावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी ) कर्मचाऱ्यांनी ८ आणि ९ जून रोजी कामबंद आंदोलन पुकारलं होतं. एसटीमध्ये नव्या भरती प्रक्रियेअंतर्गत अंदाजे ९ हजार कर्मचाऱ्यांची रोजंदारीवर भरती करण्यात आली आहे. १८० दिवस पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केलं जातं. असं असताना अचानक करण्यात आलेल्या संपात १८० दिवस पूर्ण न झालेले कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती मागे!
SHARES

वेतनवाढीच्या मुद्द्यावरून संपात सहभागी होत एसटी महामंडळाच्या मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी मुंबईसहित १०१० कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय महामंडळाने घेतला होता. हा निर्णय महामंडळाने सोमवारी मागे घेतला. यामुळे नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचं गाऱ्हाण ऐकूण घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख यांच्या यशस्वी मध्यस्तीनंतर एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला.


१ जुलैपासून सेवेत

एसटी महामंडळाच्या परिपत्रकानुसार सर्व कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून नव्याने सेवेत सामावून घेतलं जाणार आहे.


सेवा समाप्तीचा निर्णय का?

वेतनवाढीच्या मुद्यावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी ) कर्मचाऱ्यांनी ८ आणि ९ जून रोजी कामबंद आंदोलन पुकारलं होतं. एसटीमध्ये नव्या भरती प्रक्रियेअंतर्गत अंदाजे ९ हजार कर्मचाऱ्यांची रोजंदारीवर भरती करण्यात आली आहे. १८० दिवस पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केलं जातं. असं असताना अचानक करण्यात आलेल्या संपात १८० दिवस पूर्ण न झालेले कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.


३३ कोटींचं नुकसान

संपादरम्यान शिवशाहीच्या १९ बसगाड्यांसह ९३ बसगाड्यांचं संपकऱ्यांनी अडवून फोडल्या. संपामुळं आधीच तोट्यात असलेल्या एसटीला ३३ कोटींचं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं.


घरचा रस्ता

त्यामुळं संपात सहभागी कर्मचाऱ्यांविरोधात एसटी प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारत मुंबईतील १३८ तर मुंबईबाहेरील १०१० अशा एकूण ११४८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करत त्यांना घरचा रस्ता दाखवला होता. एवढंच नव्हे, तर या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन भरती प्रक्रियेतील प्रतिक्षा यादीवरील ३ हजार उमेदवारांना सामवून घेण्याचं ठरवलं होतं.

सेवा समाप्त झालेल्यांमध्ये मुंबईतील परळ आगारातील ३८, कुर्ला आगारातील २२ आणि पनवेल आगारातील १८ कर्मचाऱ्यांचा समावेश होता.



हेही वाचा-

मुंबईतील १३८ एसटी कर्मचाऱ्यांना संप महागात

Exclusive: वेतनवाढ नकोय तर लिहून द्या! दिवाकर रावते



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा