Advertisement

आता शिवशाहीने करा मुंबई-गोवा 'कूल' प्रवास

गोव्यात सेलिब्रेशनसाठी जाण्यास इच्छुक प्रवाशांच्या सोईसाठी एसटी महामंडळाने शुक्रवारपासून मुंबई-गोवा मार्गावर वातानुकलीत शिवशाही बससेवा सुरू केली आहे. या सेवेच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांनी बसमधील ४५ पैकी ४० सीट ऑनलाईनने बुक केल्या आहेत.

आता शिवशाहीने करा मुंबई-गोवा 'कूल' प्रवास
SHARES

ख्रिसमस आणि न्यू इयरचं सेलिब्रेशन म्हटलं मुंबईकरांच्या डोळ्यापुढे येणारं पहिलं डेस्टिनेशन म्हणजे गोवा. याच पार्श्वभूमीवर गोव्यात सेलिब्रेशनसाठी जाण्यास इच्छुक प्रवाशांच्या सोईसाठी एसटी महामंडळाने शुक्रवारपासून मुंबई-गोवा मार्गावर वातानुकलीत शिवशाही बससेवा सुरू केली आहे. या सेवेच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांनी बसमधील ४५ पैकी ४० सीट ऑनलाईनने बुक केल्या आहेत.



कोकणवासीयांनाही उपयुक्त

ख्रिसमस आणि न्यू इयरसाठी मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईहून गोव्याला जातात. त्यानुसार एसटी महामंडळाने सुरू केलेली शिवशाही बसची सेवा गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांसोबतच कोकणवासीयांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. प्रति व्यक्ती ९१३ रुपये अशा माफक दरात या बसचं तिकीट उपलब्ध होत आहे.


मुंबई ते पणजी

ही बससेवा मुंबई ते पणजी या मार्गावर धावणार आहे. यामुळे गोवा आणि कोकणला जाणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे ऐन सिझनमध्ये गाड्या मिळणं मुश्किल होत असताना प्रवाशांना शिवशाही बसमधून गारेगार प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.



या मार्गावर धावेल

ही शिवशाही बस दररोज मुंबई सेंट्रल येथून संध्याकाळी ५ वाजता सुटणार आहे. पनवेल, चिपळूण, लांजा, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, बांदा, म्हापसा मार्गे ही बस पणजीला जाईल. तसेच पणजीहून रोज संध्याकाळी ६ वाजता याच मार्गे परतीचा प्रवास करेल. प्रवाशांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आलं आहे.



हेही वाचा-

एसटी महामंडळात तक्रार करायची आहे? मग 'या' नंबरवर कॉल करा

आता 'शिवशाही'त वाजणार 'शहनाई' !


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा