Advertisement

एसटीची मंत्रालयापर्यंत विशेष बस सेवा सुरू, 'या' कर्मचाऱ्यांना करता येईल प्रवास

कर्मचाऱ्यांना मंत्रालयात पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने विशेष बस (st bus) चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटीची मंत्रालयापर्यंत विशेष बस सेवा सुरू, 'या' कर्मचाऱ्यांना करता येईल प्रवास
SHARES

कोरोना व्हायरसला (coronavirus) आळा घालण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी (curfew in maharashtra) लागू केली असली, तरी अत्यावश्यक सेवा सुरूच आहेत. शिवाय सर्व सरकारी कार्यालयं देखील कमीत कमी ५ टक्के मनुष्यबळासह चालवण्यात येत आहे. अशा स्थितीत या कर्मचाऱ्यांना मंत्रालयात पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने विशेष बस (st bus) चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा- अन्यथा भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल- अजित पवार 

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीतही मुंबई महापालिका (bmc employees) आणि मंत्रालयीन कर्मचारी (mantralaya employees) आपल्या कर्तव्यावर हजर राहत राज्यातील जनतेला सेवा देत आहेत. परंतु मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल ट्रेन आणि बेस्टची बस सेवा बंद करण्यात आल्याने शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्यावर पोहोचण्यास अडचणी येत आहेत. त्यांची गैरसोय ओळखून एसटी महामंडळ पुढे आलं आहे. 

त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरातील कर्मचाऱ्यांना थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळ ठाणे आणि पालघर विभागातून विशेष एसटी बस चालवणार आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांचा कामावर जाण्याचा आणि घरी परतण्याचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण, डोंबिवली आणि कळवा तर पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार आणि नालासोपारा इथून मंत्रालय गार्डन गेट इथपर्यंत ही एसटी बस सेवा पुरवण्यात येणार आहे. त्याशिवाय मुंबई महापालिकेने एसटी महामंडळाकडून काही बस भाड्याने घेतल्या असून महापालिका कर्मचाऱ्यांसाठी १० विशेष एसटी चालवण्यात येणार आहेत.

३१ मार्चपर्यंतचं वेळापत्रक ‘असं’

  • मार्ग सुटण्याची वेळ (सकाळी) परतीचा प्रवास वेळ (सायंकाळी)
  • कल्याण स्थानक ते मंत्रालय - ८ आणि ८.१५ ५.४५ आणि ६.१५
  • डोंबिवली स्थानक ते मंत्रालय - ८ आणि ८.३० ५.४५ आणि ६.१५
  • कळवा स्थानक ते मंत्रालय -८. १५ आणि ८.३० ५.४५ आणि ६.१५
  • विरार स्थानक ते मंत्रालय - ७ आणि ७.३० ५.४५ आणि ६.१५
  • नालासोपारा स्थानक ते मंत्रालय - ७ आणि ७.३० ५.४५ आणि ६.१५

हेही वाचा- मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोक्का लावा- आशिष शेलार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा