Advertisement

दिवाळी जवळ आली तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटेना

राज्य सरकारकडून रखडलेला निधी, बँकांकडून कर्ज मिळवण्याची लांबलेली प्रक्रिया यामुळे वेतनासाठी विलंब होणार असल्याची शक्यता आहे.

दिवाळी जवळ आली तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटेना
SHARES

राज्य सरकारकडून रखडलेला निधी, बँकांकडून कर्ज मिळवण्याची लांबलेली प्रक्रिया यामुळे वेतनासाठी विलंब होणार असल्याची शक्यता आहे. ऑगस्ट, सप्टेंबरपाठोपाठ ऑक्टोबर महिन्याचे वेतनही रखडणार असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर सुमारे एक लाख एसटी कर्मचारी चिंतेत आहेत.

राज्य सरकारने उपलब्ध केलेल्या निधीतून जुलैचे वेतन ऑक्टोबरमध्ये मिळाले. ऑगस्ट व सप्टेंबरचे वेतन अजूनही रखडले आहे. वेतन व इतर खर्च भागवण्यासाठी बँकांकडूनही कर्ज काढण्याची महामंडळाची तयारी आहे. परंतु ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. परिणामी ऑक्टोबरचेही वेतन रखडणार आहे.

साधारण मे, जूनपासून एसटीची सेवा सुरू झाल्यानंतरही प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढलेले नाही. लॉकडाऊनपूर्वी मिळणारे २२ कोटी रुपये उत्पन्न सध्या ७ कोटींवर आले आहे. त्यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट झाली असून सरकारकडून मिळणाऱ्या निधीवर खर्चाचे गणित मांडावे लागत आहे. मात्र अद्याप तोडगा न निघाल्याने ९ नोव्हेंबरला एसटी कामगार आपल्या घरासमोर कुटुंबीयांसह आक्रोश आंदोलन करणार असल्याची माहिती मिळते.

रेल्वे कर्मचाऱ्यांना १७,९७५ तर बेस्ट कर्मचाऱ्यांना १०,१०० रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान सोडाच वेतनासाठीही वाट पाहावी लागत आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा