Advertisement

मुंबई : चर्चगेट-विरार दरम्यान 15 डब्यांची धीम्या लोकल धावणार

चर्चगेट-अंधेरी दरम्यानच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याची योजना आहे.

मुंबई : चर्चगेट-विरार दरम्यान 15 डब्यांची धीम्या लोकल धावणार
SHARES

मुंबई महानगराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोंडीचा भार रेल्वे वाहतुकीवर पडत आहे. सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागतो. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलमधील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आता चर्चगेट-विरारदरम्यान 15 डब्यांची धीम्या लोकल सुरू करण्याची योजना आहे. 

चर्चगेट-अंधेरी दरम्यानच्या फलाटाची लांबी वाढवण्याची योजना आहे. लवकरच चर्चगेट ते विरारपर्यंत 15 डब्यांची धीम्या लोकल धावण्यास सज्ज होणार आहे. (Mumbai a slow local of 15 coaches will run between Churchgate-Virar))

पश्चिम रेल्वेवर प्रवाशांची संख्या वाढत असून 15 डब्यांची लोकल सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. पश्चिम रेल्वेवर सध्या 15 डब्यांच्या 199 लोकल अंधेरी-विरार स्लो आणि चर्चगेट-विरार फास्ट दरम्यान धावतात. प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्याने चर्चगेट-अंधेरी दरम्यान धीम्या मार्गावर 15 डब्यांची लोकल फेरी नाही. त्यामुळे धीम्या मार्गावरील 12 डबे असलेल्या लोकल गाड्यांमध्ये गर्दी असते.

प्रवाशांची वाढती संख्या पाहता लोकलचे 15 डबे वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी चर्चगेटपर्यंतच्या सर्व फलाटांची लांबी वाढवण्याची योजना आहे. पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 15 डबे असलेल्या लोकल ट्रेनसाठी आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.

चर्चगेट-अंधेरीदरम्यान धीम्या मार्गावर 15 डब्यांची लोकल चालवण्याचा विचार करण्यात येत आहे. चर्चगेट-अंधेरी दरम्यानच्या प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण शक्य आहे का? याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी सांगितले.हेही वाचा

रेल्वे प्रवाशांनो लक्ष्य द्या, विनातिकिट प्रवास करणे महागात पडेल

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर धावणार बस, जाणून घ्या किती असेल भाडे?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा