Advertisement

मुंबईतल्या उपनगरीय स्थानकांवर 30 नवे सरकते जिने


मुंबईतल्या उपनगरीय स्थानकांवर 30 नवे सरकते जिने
SHARES

प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबईतील उपनगरीय स्थानकांवर 30 नवे सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. अशी महिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांना वेस्टर्न कोल फिल्ड्स लि. या कंपनीकडून कोटी रुपयांचा सहाय्यता निधी मिळाला आहे. या निधीद्वारे मध्य रेल्वेवर 25 आणि पश्चिम रेल्वेवर पाच सरकते जिने बसवले जाणार आहेत. या आर्थिक वर्षात रेल्वेला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे हे काम येत्या आर्थिक वर्षातच पूर्ण होणार असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून आठ स्थानकांवर 16 सरकते जिने बसवले जातील. त्याशिवाय या सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे 25 जिन्यांची भर पडणार आहे. त्यामुळे येत्या वर्षाअखेर मध्य रेल्वेवर 60 अतिरिक्त सरकते जिने कार्यान्वित होणार आहेत. म्हणजेच मध्य रेल्वेवरील सरकत्या जिन्यांची संख्या 75 एवढी असेल. तर पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर 26 सरकते जिने बसवले आहेत. तर काही स्थानकांवर अजूनही सरकत्या जिन्यांचे काम सुरू आहे. या वर्षात आणखी 28 नवीन सरकते जिने बसवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच कंपन्यांच्या सामाजिक निधीद्वारे आणखी 25 सरकते जिने बसवण्याचा संकल्प पश्चिम रेल्वेने केला आहे.

मध्य रेल्वेवरील नवे सरकते जिने

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) (2)
भायखळा (2)
चेंबूर (2)
पनवेल (2)
बदलापूर (2)
कर्जत (2)
चिंचपोकळी (1)
परळ (1)
माटुंगा (1)
शीव (1)
नाहूर (1)
मुलुंड (1)
कळवा (1)
मुंब्रा (1)
दिवा (1)
शिवडी (1)
टिळक नगर (1)
टिटवाळा (1)
कसारा (1)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement