Advertisement

२ दिवसांत सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करा अन्यथा आंदोलन; प्रवासी संघटनेचा रेल्वेला इशारा

पुढील २ दिवसांत लोकल सुरू न केल्यास आंदोलन करू असा इशारा उपनगरी रेल्वे प्रवासी एकता महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिला आहे.

२ दिवसांत सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करा अन्यथा आंदोलन; प्रवासी संघटनेचा रेल्वेला इशारा
SHARES

मुंबईची लाइफलाइन लोकल (mumbai local) ही मुंबईकरांचा कणा असून, दररोज लाखो प्रवाशांनासोबत धावत असते. आजपर्यंत ही लोकल दंगल अथवा पावसाळ्यात रुळावर पाणी साचल्यानं बंद पडली. मात्र, काही तास व काही दिवसांसाठी बंद राहिली. परंतु, मुंबई लोकलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका व्हायरसमुळं लोकल सेवा बंद राहिली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत कमी होत असून रेल्वे प्रशासनानं लोकल सेवा सुरू केली आहे. सुरुवातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच (essential workers) सुरू असणारी लोकल आता इतर कर्मचारी वर्गासाठीही सुरू करण्यात आली आहे. परंतु, अद्याप सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यात आली नाही. त्यामुळं पुढील २ दिवसांत लोकल सुरू न केल्यास आंदोलन करू असा इशारा उपनगरी रेल्वे प्रवासी एकता महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिला आहे.

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळं सर्वच सोयीसुविधा व वाहतूक सेवा विशेष म्हणजे मुंबईची लाइफलाइन लोकल सेवाही बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा मुंबईतील प्रादुर्भाव कमी होत असल्यानं सोयीसुविधांसह मुंबई लोकल सेवाही सुरू करण्यात आली. परंतु लोकलही केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी असून सामान्यांसाठी नसल्यानं चाकरमान्यांना प्रवासावेळी मोठ्या त्रासांचा सामना करावा लागतो.

'राज्यभरात टप्प्याटप्प्यानं सोयीसुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्यानं सर्वसामान्यांसाठी लोकल सूर करा. लोकांची सहनशीलता आता संपलेली आहे. लोकल सेवा बंद असल्यामुळं खिशाला कात्री लावून प्रवास करावा लागत असल्यानं लवकरात लवकर लोकल सुरू करा', अशी मागणी नंदकुमार देशमुख यांनी केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा