Advertisement

मुंबई मेट्रो 2A आणि 7 पूर्ण क्षमतेने मुंबईकरांच्या सेवेत दाखल, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो 7 आणि मेट्रो 2A चे उद्घाटन करण्यात आले.

मुंबई मेट्रो 2A आणि 7 पूर्ण क्षमतेने मुंबईकरांच्या सेवेत दाखल, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
SHARES

मुंबई मेट्रो (Mumbai metro) शुक्रवार म्हणजे उद्याासून पूर्ण क्षमतेने मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. 

लाईन 2A जी दहिसरला अंधेरी पश्चिम डीएन नगरला जोडते आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व ला जोडणारी लाईन 7 चे उदघाटन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो 7 आणि मेट्रो 2A चे उद्घाटन करण्यात आले. 

उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास किती झाला ते आपल्याला माहिती आहे. अगदी ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्याची संधी आम्हाला मिळाली ती केवळ नरेंद्र मोदींच्यामुळे अशी स्तुतीसुमनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांवर उधळले. काही लोकांना वाटायचं की या कार्यक्रमाचे उद्धाटन मोदींच्या हातून होऊ नये, पण नियतीसमोर कुणाचं काही चालत नाही."

हेसुद्धा वाचा - मुंबई मेट्रो 2A आणि 7 मार्गावरील तिकिटांचे दर जाहीर, स्थानकांची यादी तपासा

2A मुंबई मेट्रो लाईन 18 किमी पेक्षा जास्त लांब आहे आणि त्यात 17 स्थानके आहेत. अंधेरी (पश्चिम), पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड (पश्चिम), एकसर, मंडपेश्वर, कांदरपाडा, अप्पर दहिसर आणि दहिसर (पूर्व), लोअर ओशिवरा, ओशिवरा, गोरेगाव (पश्चिम), वलणई, डहाणूकरवाडी, कांदिवली (पश्चिम), पहाडी एकसर, बोरिवली (पश्चिम) या स्थानकांचा समावेश आहे. 

दहिसर हे दोन्ही मार्गांसाठी सामायिक स्थानके असतील. त्यामुळे ज्यांना डीएन नगर आणि अंधेरी पूर्वेला जायचे आहे त्यांना इथेच मेट्रो बदली करावी लागेल. न्यू लिंक रोड आणि दहिसर पूर्व ते डीएन नगर दरम्यान रहदारी कमी करणे हे या मार्गाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

हेसुद्धा वाचा - मेट्रो 2A आणि 7 च्या प्रवाशांसाठी बेस्ट 20 जानेवारीपासून 'या' मार्गांवर धावणार

मुंबई मेट्रो लाईन 7 ही 16.5 किमी लांबीची असून त्यात 13 स्थानके आहेत. गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी (पूर्व), गोरेगाव (पूर्व), आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान आणि ओवरीपाडा या स्थानकांचा यात समावेश आहे.  यात अंधेरीतील लाईन 1 आणि लाईन 6 च्या JVLR येथे लाईन 2A येथे इंटरचेंज असेल.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा