Advertisement

मागाठाणे मेट्रो स्थानकातून प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज

आता मेट्रो प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

मागाठाणे मेट्रो स्थानकातून प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज
SHARES
‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेतील बोरिवली येथील मागाठाणे मेट्रो स्थानकाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार अखेर दोन माहिन्यांनंतर खुले करण्यात आले. त्यामुळे आता मेट्रो प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

जुलैमध्ये मागाठाणे मेट्रो स्थानकालगत एका खासगी विकासकाच्या कामादरम्यान रस्ता खचल्याची घटना घडली होती.

मेट्रो स्थानकाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारालगत हा रस्ता असल्याने मेट्रो स्थानकाचा काही भाग बाधित झाला होता. त्यामुळे महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) जुलैमध्ये बाधित परिसर बंद केला होता. स्थानकाच्या उत्तरेकडील एका प्रवेशद्वाराचा त्यात समावेश होता.

या घटनेनंतर मेट्रो स्थानकातील बाधित परिसराची आयआयटीकडून तपासणीही करण्यात आली होती. दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने या रस्त्याची, परिसराची दुरुस्ती केली.

मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वारही आता सुरक्षित झाले आहे. त्यामुळे हे प्रवेशद्वार पुन्हा प्रवाशांसाठी खुले करण्यात आल्याची माहिती एमएमएमओसीएच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.हेही वाचा

दादर लोकल परेल स्टेशनवरुन सुटणार, पहा टाईमटेबल

जादा शुल्क आकारणाऱ्या बसचालकांविरोधात तक्रार करा, व्हॉट्सअॅप क्रमांक जारी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा