Advertisement

मुंबई-पुणे हॅलिकॉप्टर सेवा लवकरच होणार सुरू

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच हॅलिकॉप्टरमधून प्रवास करता येणार आहे.

मुंबई-पुणे हॅलिकॉप्टर सेवा लवकरच होणार सुरू
SHARES

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच हॅलिकॉप्टरमधून प्रवास करता येणार आहे. अमेरिकेची हॅलिकॉप्टर टॅक्सी कंपनी

ब्लॅड (BLADE) ही २ शहरांदरम्यान फ्लॅय-बाय--सीट चॉपर सर्विस सुरू करत आहे. या हॅलिकॉप्टर सेवेद्वारे मुंबई-पुणे

प्रवास अवघ्या ३५ मिनिटांत करता येणार आहे. त्याशिवाय ही कंपनी मुंबई ते शिर्डी या मार्गावरही हॅली-टॅक्सी(हॅलीकॉप्टर

टॅक्सी) सेवा सुरू करणार आहे.


हेलिकॉप्टर सेवा

हॅली-टॅक्सी(हॅलीकॉप्टर टॅक्सी) या सेवेसाठी सर्वप्रकारच्या परवानग्या मिळाल्या आहेत. तसंच, ३ शहरांमधील हेलिकॉप्टर सेवा

ऑक्टोबरच्या मध्यात सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही हॅलिकॉप्टर सेवा आठवड्यातील ६ दिवस पुरविण्यात

येणार आहे.


३ हॅलिकॉप्टरचा वापर

सोमवार ते शनिवार मुंबई आणि पुणे आणि मुंबई आणि शिर्डी या मार्गावर हॅलिकॉप्टर सेवा पुरवली जाणार आहे. ब्लेडचे

हेलिकॉप्टर्स सीट-आधारावर कार्य करत आहेत. या हॅलिकॉप्टर सेवेचं तिकीट भाडं अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही. या

सेवेसाठी ३ हॅलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक हॅलिकॉप्टरमध्ये ५ जण असणार आहेत. मुंबईतील महालक्ष्मी

रेसकोर्स हेलिपॅड येथून हे हॅलिकॉप्टर सुटणार असून पुण्यातील मुंढवा आणि शिर्डी इथं चैतन्यपूर, कोपरगाव येथून सुटणार आहे.



हेही वाचा -

घाबरू नका, बघा, काय म्हणाले PMC बँकेचे प्रमुख?

खार इथं कोसळली ५ मजली इमारत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा