Advertisement

वाहन चालकांनो, नियम तोडलात तर, कारवाई होईल


वाहन चालकांनो, नियम तोडलात तर, कारवाई होईल
SHARES

नवीन वाहन खरेदी केल्यानंतर अनेक जण गाडीच्या नंबरप्लेटवर आपल्या लाडक्या व्यक्ती किंवा देवी देवतांचे नाव लिहितात. काही जण वेगवेगळी चित्रे आणि नक्षी देखील काढतात.

पण आता वाहनचालकाने आपल्या गाडी किंवा नंबरप्लेटवर जर असे काही केल्यास परिवहन विभागांतर्फे कठोर कारवाई केली जाईल. आरटीओतर्फे करण्यात आलेल्या कारवाईत परवान्यांची वैधता नसणे, विमा प्रमाणपत्र तपासणे, हेल्मेट वापर-सीटबेल्ट, दुचाकीवर दोनपेक्षा जास्त प्रवासी, वाहन चालवताना मोबाइलचा वापर, नियमबाह्य नंबरप्लेट, वाहनांवर नियमबाह्य प्रखर दिवे, मल्टी टोन हॉर्न आदींबाबत तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षासंदर्भात नियुक्त केलेल्या ‘रस्ता सुरक्षा समिती’च्या सूचनांच्या आधारे परिवहन विभाग कारवाई करत आहे. साधारणपणे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील वाहनांवर होणाऱ्या कारवाईत कमतरता असल्याचे आढळून येते. त्यामुळे अशा प्रकारे नियमबाह्य पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी आरटीओचे राज्यभरातील पथकाने कारवाई करण्यास सुरू केली असून नियमांचे उल्लघंन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येईल.

सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या ‘रस्ता सुरक्षा समितीने राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील बेकायदाशीर आणि नियम मोडणाऱ्या वाहनांवर ऑगस्ट २०१७ मध्ये कारवाई झाली नसल्याचे अहवालात नमूद केले होते. त्याची दखल घेत परिवहन विभागाने कारवाई करण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम २२ सप्टेंबरपर्यंत चालणार असून त्यात राज्यातील सर्व आरटीओ कार्यालये सहभागी असतील.
- एस. बी. सहस्त्रबुद्धे, सहआयुक्त, परिवहन विभाग


हेही वाचा - 

खाकीतल्या पोलिसांना करावं लागतंय वाहतूक पोलिसांचं काम!

बेलगाम बाईकस्वारांना रोखणे हाच ध्यास!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा