Advertisement

नाना शंकरशेट टर्मिनस नामांतरासाठी मूक निदर्शने


नाना शंकरशेट टर्मिनस नामांतरासाठी मूक निदर्शने
SHARES

भारतात रेल्वे सुरू करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यात नाना शंकरशेट यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणूनच त्यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामांतर नाना शंकरशेट टर्मिनस व्हावे याकरिता रविवारी 16 एप्रिलला मुंबई सेंट्रल टर्मिनस मुख्य प्रवेशद्वाराबाहेर मूक निदर्शन आयोजित करण्यात आले.

तत्कालिन इंग्रज सरकार खरंतर पहिली रेल्वे कोलकत्त्यात सुरू करणार होते परंतु नाना शंकरशेट यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच त्यांनी यासाठी स्वत:ची जागा उपलब्ध करून देऊन मुंबईला तो मान मिळवून दिला. याची जाणीव ठेवून त्यांची स्मृती चिरंतन रहावी यासाठी, नाना शंकरशेट प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद यांनी मूक निदर्शनाचे आयोजन केले होते. या मूक आंदोलनामध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतही सामील झाले होते.

इंग्रजांनीदेखील गौरविलेेेले भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यावे तसेच केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठीच्या मोहीमेत मोठया प्रमाणात लोकांनी सहभाग घेतला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा