Advertisement

नोव्हेंबरपासून विरार फास्ट 'या' स्थानकांवर थांबणार नाहीत!

१ नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणाऱ्या नव्या वेळापत्रकानुसार पश्चिम रेल्वे मार्गावर १० फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. या लोकल गाड्याच्या फेऱ्या विरार ते डहाणू मार्गावर होणार आहेत.

नोव्हेंबरपासून विरार फास्ट 'या' स्थानकांवर थांबणार नाहीत!
SHARES

प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेने नोव्हेंबरपासून वेळापत्रकात बदल करण्याचं ठरवलं आहे. या बदलानुसार विरारच्या दिशेने जाणाऱ्या काही जलद लोकलचे थांबे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकामधील रद्द करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे.

त्यानुसार चर्चगेटहून सुटणाऱ्या आणि विरारच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल मरिन लाइन्स, चर्नी रोड आणि ग्रँटरोड या स्थानकांवर थांबवणार नाहीत. या लोकल कुठल्या असतील. तसंच लोकलच्या वेळा नवीन वेळापत्रक आल्यानंतरच स्पष्ट होईल.


१० फेऱ्या वाढणार

१ नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणाऱ्या नव्या वेळापत्रकानुसार पश्चिम रेल्वे मार्गावर १० फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. या लोकल गाड्याच्या फेऱ्या विरार ते डहाणू मार्गावर होणार आहेत.


हार्बरवर २० फेऱ्यांचा विस्तार

हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी अंधेरी ते गोरेगाव स्थानकापर्यंत २० फेऱ्यांचा विस्तार करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. त्यामुळे हार्बरवरील प्रवाशांची गर्दी कमी होण्याची शक्यता आहे.


महिला प्रवाशांना दिलासा

महिला प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वेने संध्याकाळी ६.५१ वाजेच्या चर्चगेट ते भाईंदर लोकलचा विस्तार विरार स्थानकापर्यत करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार सकाळी ९.५६ वाजेची वसई ते चर्चगेट लोकल विरार स्थानकातून सुटणार आहे.



हेही वाचा-

बोरिवली स्थानक ठरलं पहिलं ‘अंधमित्र’ रेल्वे स्थानक

महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा