Advertisement

परवानाधारक रिक्षा चालकांना अनुदानासाठी फॉर्म भरण्याची गरज नाही

परवानाधारक रिक्षा चालकांना अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षा चालकांकडून मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेत असल्याच्या तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे आल्या आहेत.

परवानाधारक रिक्षा चालकांना अनुदानासाठी फॉर्म भरण्याची गरज नाही
SHARES

परवानाधारक रिक्षा चालकांना अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षा चालकांकडून मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेत असल्याच्या तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे आल्या आहेत. त्यावर कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना १५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. मात्र हे अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली काही प्रतिनिधी संघटना रिक्षा चालकांकडून फाॅर्म भरून घेत आहेत. यासंदर्भातील तक्रारी मिळाल्यावर परिवहन आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान त्यांच्या थेट बँक खात्यात देण्यासंदर्भात पोर्टल तयार करण्याचं काम सुरू आहे. 

हेही वाचा- 'इतक्या' रिक्षाचालकांना शासनाकडून १५०० रुपयांची मदत

ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व संघटना व रिक्षाचालकांना याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित केलं जाईल. यासाठी मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेणं किंवा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे असे फाॅर्म कुणीही भरू नका, असं परिवहन उपायुक्त यांनी कळवलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचा रिक्षा व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा विचार करून राज्यातील ७ लाख २० हजार परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपये या प्रमाणे १०८ कोटी रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यानुसार या मदतनिधी वाटपासाठी परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर काम सुरू आहे.

सध्या रिक्षा चालकांना केवळ दोनच प्रवासी घेऊन जाण्यास मुभा देण्यात आलेली आहे. परंतु महाराष्ट्रात लाॅकडाऊन सुरू असल्याने अत्यावश्यक सेवांनाच परवानगी आहे. परिणामी रस्त्यांवरील प्रवासी संख्याही नगण्य स्वरूपात आहे. यामुळे रिक्षा चालकांना तासनतास प्रवाशांची वाट बघत ताटकळत बसावं लागत आहे. रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे. 

(no manual form needed to get 1500 rupees aid for rickshaw driver clarifies maharashtra government transport office)

हेही वाचा- पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात होणार 'फॅमिली मॉल'


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा