Advertisement

वाहतूक नियम मोडल्यास ई-चलानविषयक कारवाईची नोटीस


वाहतूक नियम मोडल्यास ई-चलानविषयक कारवाईची नोटीस
SHARES

वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास १५ दिवसांमध्ये  वाहतूक पोलीस, आरटीओ किंवा संबंधित विभागाकडून ई-चलानविषयक कारवाईची नोटीस पाठविण्यात येणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयानं ई-चलानबाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे. त्यात बदल करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर देखरेख वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे.

१० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यातील काही शहरांतच त्याची अंमलबजावणी होईल, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील १९ शहरात अंमलबजावणी होणार असून यात अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, उल्हासनगर, ठाणे, वसई-विरार या शहरांचा समावेश आहे.

सध्या या शहरांत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा, स्पीड गन व कॅमेरांसह असलेल्या इंटरसेप्टर वाहनांमार्फत तसेच मोबाइलद्वारेही वाहतूक पोलीस, आरटीओकडून कारवाई केली जाते. याशिवाय बॉडी कॅमेरा, स्वयंचलित वाहन क्रमांक ओळखणारे कॅमेरा शिवाय डॅशबॉर्ड कॅ मेराही बसवून कारवाईची मुभा दिली आहे.

पोलीस किंवा आरटीओच्या वाहनांत डॅशबॉड कॅमेरा बसवू शकतो, असे स्पष्ट केले आहे. शिवाय ज्या भागात या कॅ मेऱ्यांद्वारे देखरेख होत आहे, अशा भागात कारवाईचा इशारा देणारे चिन्ह, सांकेतिक खुणा दर्शविण्याची सूचनाही केली आहे. जेणेकरून वाहतूक नियमांच्या उल्लंघनाला आधीच आळा बसेल. अशा अनेक सूचना त्यात करण्यात आल्या आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा