Advertisement

आता ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन मिळणार - परिवहन मंत्री अनिल परब

गुरुवारी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते यांचे उद्घाटन झाले.

आता ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन मिळणार - परिवहन मंत्री अनिल परब
SHARES

परिवहन विभागाने अनुज्ञप्ती (लायसन्स) नूतनीकरण, पत्ता बदलणे, अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण (डु्प्लिकेट) यासह सहा सेवा ऑनलाइन केल्या आहेत. त्याची सुरुवात गुरुवारी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते परिवहन आयुक्त कार्यालयात करण्यात आली.

अर्ज आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी वाहनचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाण्याची आवश्यकता राहणार नाही. यावेळी परिवहन आयुक्त अविनाश ढाकणेही उपस्थित होते.

परिवहन विभागातर्फे अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्र, परवानासंबंधित ११५ सेवा देण्यात येतात. यातील ८४ सेवा ऑनलाइन केल्या आहेत. मात्र दुय्यम नोंदणी प्रमाणपत्राकरिता अर्ज, ना हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदल, वाहनचालकाच्या अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण, पत्ता बदल, नूतनीकरण या सेवांसाठी अर्ज आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात हेलपाटे घालावे लागत होते. यामध्ये चालकांचा वेळ खर्च होत होता. मात्र गुरुवारपासून या सेवाही ऑनलाइन करण्यात आल्या आहेत.

‘‘या सेवांचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराकडे आधारकार्ड आणि त्यावरील अचूक भ्रमणध्वनी क्रमांक आवश्यक आहे,’’ असे अविनाश ढाकणे यांनी सांगितले.

अर्जदाराचे नाव, पत्ता, जन्म तारीख आणि भ्रमणध्वनी क्रमांक याची खातरजमा झाल्यानंतर ऑनलाइन करण्यात आलेल्या सहा सेवांकरिता अर्जदारास कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.

तसेच नवीन अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्र हे अर्जदारास टपालाद्वारे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदाराच्या वेळेची बचत होणार आहे. कागदपत्रांचीही प्रत काढण्याची आवश्यकता राहणार नाही. या सेवेचा फायदा २० लाख नागरिकांना मिळेल, अशी आशा परिवहनमंत्री अनिल परब यांनी व्यक्त केली.



हेही वाचा

मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही, २ कोटी ८० लाखांचा खर्च

पावसाळ्यानंतर वॉटर टॅक्सी सेवा गेटवे ऑफ इंडियापासून सुरू होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा