Advertisement

आता हार्बर आणि मध्य रेल्वेवर एका रुपयात उपचार!


आता हार्बर आणि मध्य रेल्वेवर एका रुपयात उपचार!
SHARES

मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर अवघ्या एका रुपयात उपचार करता येणार आहेत. पाच रेल्वे स्थानकांवर दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. दादर, कुर्ला, मुलुंड, घाटकोपर आणि वडाळा स्टेशनवर पुढच्या आठवड्यापासून हे दवाखाने सुरू होतील. प्रवाशांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी मध्य रेल्वेने एका खासगी संस्थेसोबत करार करत, एका रुपयात दवाखाना सुरू करण्याची योजना आखली आहे.

रेल्वे अपघात, छातीत दुखणे तसेच प्रसुतीसंदर्भात त्वरित उपचार मिळावेत, यासाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. प्रवाशांना सहज आणि स्वस्त दरात वैद्यकीय उपचार मिळावेत, हा यामागील मुख्य हेतू आहे. प्रत्येक दवाखान्यात एमबीबीएस आणि एमडीची पदवी असलेले डॉक्टर रुग्णांच्या सेवेत असतील. हे दवाखाने 24 तास सुरू राहणार असून येथे दर दिवशी त्वचारोग तज्ज्ञ, मधुमेह तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञही असतील.

या आठवड्यात पाच स्टेशनवर ‘एक रुपयात दवाखाना’ सुरू होईल. त्यानंतर मध्य आणि हार्बरच्या 19 स्टेशनवर त्यांचा विस्तार होईल. प्रत्येक पाच स्टेशनवर दरदिवशी किमान 100 प्रवाशांना तपासले जाईल. या दवाखान्यांमध्ये रक्त तपासणीसह औषधांची दुकानेही उपलब्ध असतील. सर्व रक्ताचे नमुने तपासणीसाठी वडाळ्याच्या पॅथोलॉजी लॅबमध्ये पाठवले जातील. तसेच यात छोटे मेडिकल, पॅथोलॉजी किट्सही मिळतील.

मध्य रेल्वेवरील पहिल्या टप्प्याचा प्रयोग यशस्वी झाल्यावर ही योजना पश्चिम रेल्वे मार्गावरही सुरू करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा