बेस्ट 'तेजस्विनी' बसच्या संख्येत करणार वाढ


बेस्ट 'तेजस्विनी' बसच्या संख्येत करणार वाढ
SHARES
बेस्टनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. गतवर्षी बेस्टनं महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बस सेवेत दाखल केली. यामधून महिलांना प्रवास करण्यास मूभा आहे. त्याला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, सध्यस्थिती त्यांच्यीही संख्या पुरूषांप्रमाणे वाढत असल्यानं येत्या आर्थिक वर्षात बेस्टनं तेजस्विनी बसच्या संख्येत अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 


बेस्टनं दररोज ३३ लाख प्रवासी प्रवास करतात. यामध्ये १२ लाख महिला प्रवासी आहेत. बेस्टनं ३७ तेजस्विनी बस खरेदी केल्या होत्या. यामधील प्रत्येक बसची किंमत २९ लाख रुपये आहे. ३७ बसमधील २६ बस सेवेत असून ११ बस राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

महिलांसाठी विशेष बस म्हणून तेजस्विनी बस सुरू करण्यात आली होती. याला महिला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, या बसमध्ये आणखी वाढ करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, या बसमध्ये महिला कंडक्टर दाखल करण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 


गतवर्षी बेस्टनं प्रवासी तिकीटात मोठी कपात केली. प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये महिला संख्याही जास्त आहे. 


हेही वाचा -

कोरोना व्हायरस: साई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भक्तांची गर्दी कमी

Coronavirus Update: करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महापालिका घेणार खासगी रुग्णालयांची मदतसंबंधित विषय