Advertisement

मुंबई विमानतळावर ओला आणि उबरची सेवा पुन्हा सुरू

ओला आणि उबरनं पुन्हा मुंबई विमानतळावर कॅब सेवा सुरू केली आहे.

मुंबई विमानतळावर ओला आणि उबरची सेवा पुन्हा सुरू
SHARES

ओला आणि उबरनं पुन्हा मुंबई विमानतळावर कॅब सेवा सुरू केली आहे. देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्यानं कंपनीनं ही घोषणा केली आहे. याअंतर्गत प्रवाशांना उबर गो, उबर प्रीमिअम, उबर एक्सएलच्या माध्यमातून सुरक्षित आणि सरकारनं आखून दिलेल्या नियमांनुसार विमानतळावर प्रवास करता येईल.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टसोबत भागीदारी करून सॅनिटायझेशन हब्स उभारण्यात आली आहेत. प्रवासी आणि चालक भागीदारांची सुरक्षा अधिक वृद्धांगत करण्यासाठी उबरनं याची घोषणा केली आहे. या अंतर्गत सर्व गाड्या प्रत्येक ट्रिपपूर्वी निर्जंतूक केल्या जातील. त्यासाठी आत्याधुनिक साधनं आणि जंतुनाशकं वापरून उबर पिकअप झोन्समध्ये प्रवासी आणि चालकांसाठी उच्च दर्जाची सुरक्षितता पाळली जाणार आहे.

उबर इंडिया अण्ड साऊथ एशियाच्या सेंट्रल ऑपरेशन्सचे प्रमुख पवन वैश म्हणाले की, शहरे आता खुली होऊ लागली आहेत. लोक आता प्रवास करू लागले आहेत. अशात प्रवासी आणि चालक यांना सुरक्षा देण्यास उबर बांधिल आहे. गेल्या काही महिन्यात आम्ही सुरक्षा पद्धतीत सातत्यानं बदल करत आहोत.

उबरतर्फे प्रवाशांना डिजिटल आणि संपर्करहित पेमेंटचेही पर्याय देण्यात येत आहेत. उहरच्या धोरणांनुसार, चालक आणि प्रवासी दोघांसाठी मास्क बंधनकारक आहेत. निर्जंतुकीकरण केलेल्या गाडीचे दरवाजे आणि मागील दाक चालकच उघडेल. त्यामुळे प्रवाशांचा कमीतकमी स्पर्श होईल.

या उपायांना पुरक उपक्रम म्हणून उबर तर्फे त्यांच्या चालक भागीदारांना तीन दशलक्ष मास्क आणि जंतुनाशके तसंच सेनिटायझर्सच्या दोन लाख बॉटल्स मोफत वाटण्यात येत आहेत.   



हेही वाचा

बेस्टच्या ५४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू

लोकल सेवेसाठी राज्य सरकारची केंद्राकडं मागणी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा