Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ओला, उबेर चालकांचा संप मागे


मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ओला, उबेर चालकांचा संप मागे
SHARES

शनिवारी रात्रीपासून पुन्हा संपावर गेलेल्या ओला, उबेर चालक-मालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर सोमवारी सायंकाळी संप मागे घेतला. ओला, उबेर चालक - मालक संघटनेच्या नेत्यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांकडून मागण्यांवर अाश्वासन मिळाल्यानंतर संप मागे घेण्यात अाला.


अहवाल देण्याचा अादेश

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कर्मचारी संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली ओला, उबेर चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अापल्या मागण्या मांडल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मागण्यांबाबत तोडगा काढण्याचं अाश्वासन दिलं. याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी परिवहन सचिवांना या प्रकरणी एक अहवाल तयार करून सादर करण्याचा अादेश दिला अाहे.


आक्रोश मोर्चा

सोमवारी ओला, उबेर चालक - मालकांनी आझाद मैदानाजवळ आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी संध्याकाळपर्यंत या आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर एकही टूरिस्ट वाहन रस्त्यावर चालू देणार नाही, असा इशारा देण्यात अाला होता. प्रतिकिमी भाडे १८ रुपयांवरून २३ रुपये करण्यात यावे, कमीतकमी अंतरांसाठी १५० रुपयांवरून १८० रुपये भाडे करावे यांसह इतर मागण्यांसाठी ओला-उबर कर्मचारी संपावर गेले होते.


मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं अाहे की, यामध्ये मी स्वत: लक्ष घालतो. तसंच, वेळ आल्यास आपण केंद्रीय मंत्र्यांशी याबाबत चर्चा करू आणि मार्ग काढू. तसंच अधिवेशनानंतर बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे संप स्थगीत करण्यात अाला अाहे. 

- सचिन अहिर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कर्मचारी संघ 



हेही वाचा - 

नाशिक-कल्याण लोकलची येत्या १५ दिवसांत चाचणी

मोबाइलवर बोलताना आढळल्यास ३ महिने लायसन्स रद्द




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा