SHARE

मुंबईकरांना १९ ऑगस्टला ऑनलाइन रेल्वे बुकिंग करण्यासाठी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. कारण रविवारी १९ ऑगस्टला ऑनलाइन रेल्वे आरक्षण सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईच्या प्रवासी आरक्षण यंत्रणेमध्ये (पीआरएस) दुरूस्ती करण्यासाठी २ टप्प्यांमध्ये संगणकीय तिकीट यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.


'या' वेळेत राहणार बंद

रविवार १९ ऑगस्ट रोजी दुपारी २.१५ ते ३.१५ वाजेपर्यंत हे दुरुस्तीचं काम चालणार आहे. त्यामुळे दुपारी एक तास मुंबईतील सर्व संगणकीकृत आरक्षण सेवा बंद राहील. यानंतर दुपारी ३.१५ ते रात्री १०.४५ पर्यंत इंटरनेट बुकींग सेवा सुरु ठेवण्यात येईल.


रात्रीही बंद

तर रात्री १०.४५ ते मध्य रात्री १२.३० पर्यंत पुन्हा उर्वरीत दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्याने या वेळेत पुन्हा ऑनलाइन आरक्षण सेवा बंद राहणार असल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी 'सेंटर फॉर रेल्वे इंफॉर्मेशन सिस्टीम' (क्रिस)ने 'पीआरसी'मध्ये बदल करण्यासाठी काही वेळ रेल्वेकडून इंटरनेट तिकीट बुकींग बंद ठेवण्यात आले होते.हेही वाचा-

सर्व रेल्वे गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्या; दिवेकरांची मागणी

ओव्हर टाइम नाकारल्याने प. रेल्वेच्या १०० फेऱ्या रद्दसंबंधित विषय
ताज्या बातम्या