Advertisement

ओव्हरहेड वायर तुटल्यानं ट्रान्स हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत


ओव्हरहेड वायर तुटल्यानं ट्रान्स हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
SHARES

ठाणे-एेरोली स्थानकादरम्यान सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अोव्हरहेड वायर तुटल्यानं ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वेवाहतूक दोन तासांपासून खोळंबली अाहे. तासाभरानंतरही या मार्गावरील वाहतूक सुरू होणार नसल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यात अालं अाहे. रेल्वेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले असून दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू अाहे. या प्रकारामुळे मात्र ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गाचं वेळापत्रक कोलमडलं असून प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत अाहे.


कशी घडली घटना?

सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास नेरूळहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये अचानक बिघाड झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपासले असता अोव्हरहेड वायर तुटल्याचं त्यांच्या लक्षात अालं. त्यानंतर लगेच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात अाली. शनिवार असल्यानं गर्दी कमी असली तरी प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. अनेक चाकरमान्यांना पायपीट करत ठाणे स्टेशन गाठावं लागलं. ट्रान्स हार्बरवरील रेल्वे वाहतूक बंद झाल्यानं प्रवाशांना अन्य मार्गाचा अवलंब करावा लागला.


हेही वाचा -

बेस्टला 117 कोटींचं नुकसान, 6 लाख प्रवासी घटले!

खूशखबर! गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा