Advertisement

जाहिरातदारांमध्ये परळचा बोलबाला! जाहिरातीद्वारे रेल्वेची लाखोंची कमाई

जाहिरातदारांनी सर्वाधिक पसंती परळ स्थानकाला दिली.

जाहिरातदारांमध्ये परळचा बोलबाला! जाहिरातीद्वारे रेल्वेची लाखोंची कमाई
SHARES

प्रवाशांपाठोपाठ जाहिरातदारांचीही मुंबईच्या लाइफलाइनला पसंती मिळत असते. बिगरडिजिटल मीडिया जाहिरातींच्या हक्कांसाठी झालेल्या ई-लिलावात परळचा बोलबाला पाहायला मिळाला. जाहिरातदारांनी सर्वाधिक पसंती परळ स्थानकाला दिली.

परळ स्थानकाला सर्वाधिक बोली मिळाली असून आता याच स्थानकातून रेल्वेला वर्षाकाठी ३२ लाख ४ हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे. जाहिरातदारांनी परळ स्थानकाचे महत्त्व ओळखून ब्रँड एक्स्पोजरची ही संधी साधली. ठाकूर्ली स्थानकानेही जाहिरातदारांची पसंती मिळवत दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली प्राप्त केली. या स्थानकावर २६ लाख ७५ हजार ३४० रुपयांची बोली लावण्यात आली. मोक्याच्या ठिकाणामुळे ठाकूर्ली स्थानक जाहिरातदारांच्या पसंतीस उतरले.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कोपर स्थानकावर तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली लावण्यात आली. त्यामुळे आता कोपर स्थानकाद्वारे मध्य रेल्वेला वर्षाला १८ लाख १५ हजार ३०० रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

सर्वाधिक प्रवाशांचा होणारा प्रवास तसेच ब्रँड एक्स्पोजरची सर्वाधिक संधी असल्यामुळे आसनगाव स्थानकावरही ६ लाख ५० हजार रुपयांची बोली लावण्यात आली. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) स्थानकावरही ६ लाख ३३ हजार रुपयांची बोली लावण्यात आली. दरदिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेणाऱ्या टिळक नगर स्थानकानेही ४ लाख रुपयांची बोली जिंकली.

गुरु तेगबहादूर नगर (जीटीबीएन) स्थानकावरील ब्रँड दृश्यमानता लक्षात घेऊन जाहिरातदारांनी या स्थानकावर ३ लाख ५० हजार रुपयांची बोली लावली. शिवडी स्थानकावर वर्षाला ३ लाख ४० हजार रुपयांची बोली लावण्यात आली. तर डोलवली स्थानकावर अवघ्या ३० हजार रुपयांची बोली लावण्यात आली.



हेही वाचा

मुसळधार पावसात चर्चगेट स्थानकात अवतरला मोर

मुंबई - गोवा महामार्गावर रस्ता खचला

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा