Advertisement

मुसळधार पावसात चर्चगेट स्थानकात अवतरला मोर

बुधवारी स्थानकावर वेगळेच दृश्य पहायला मिळाले.

मुसळधार पावसात चर्चगेट स्थानकात अवतरला मोर
SHARES

मुंबईतील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक रेल्वे स्थानक आहे चर्चगेट. चर्चगेटवर स्थानकावर नेहमीच गर्दी पहायला मिळते. पण बुधवारी स्थानकावर वेगळेच दृश्य पहायला मिळाले. चर्चगेट स्थानकावर संध्याकाळी तिथल्या प्रवाशांना चक्क मोराचे दर्शन झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्टेशन परिसरात मोर फिरत होते. 

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रेल्वे स्थानकावर गजबजाटा आणि गर्दी होती. तरी मोर बिनधास्तपणे स्टेशन परिसरात वावरताना दिसत होते. मोरांचे मनमोहत रूप आणि आकर्षक असा पिसारा प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होते. मग काय प्रत्येकाने हे दृश्य तात्काळ मोबाईलमध्ये कॅप्चर केले.  

खरे तर चर्चगेट स्थानक परिसरात पहिल्यांदा मोर दिसल्याने प्रवाशांनी देखील आश्चर्य व्यक्त केले. अनेकांना मोरांचा फोटो काधण्याचा मोह काही आवरता आला नाही. यासोबतच अनेकांनी मोरांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. 



हेही वाचा

बोरिवलीतील मागाठाणे मेट्रो स्थानक धोक्यात, दरड कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल

मेट्रो-5 च्या फेज-2 चे काम एकाच वेळी होणार, ठाणे-भिवंडी-कल्याणमधील प्रवाशांना फायदा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा