Advertisement

जेट एअरवेज हलगर्जीपणा: प्रवाशांना पाहिजे ३० लाखांची नुकसानभरपाई

जेट एअरवेजने विमानातील प्रवाशांसाठी सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात, त्यांची काळजी घेण्यात हलगर्जीपणाचा आरोप केला. एवढंच नाही, तर नुकसान भरपाई न दिल्यास उड्डणादरम्यान घडलेल्या सर्व प्रकाराचे व्हिडिओ फुटेज सार्वजनिक करण्याची धमकीही प्रवाशांनी दिल्याचं म्हटलं आहे.

जेट एअरवेज हलगर्जीपणा: प्रवाशांना पाहिजे ३० लाखांची नुकसानभरपाई
SHARES

जेट एअरवेजच्या मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या विमानातील हवेचा दाब नियंत्रीत करणारा स्वीच 'केबिन क्रू' ने सुरूच न केल्याने गुरूवारी या विमानातून प्रवास करणाऱ्या १६६ प्रवाशांच्या जीवावर बेतलं होतं. विमानातील तब्बल ३० प्रवाशांच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव सुरू लागल्याने या विमानाचं मुंबई विमानतळावर इमर्जंसी लँडिंग करण्यात आलं. यापैकी ५ प्रवाशांना तर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जेट एअरवेजच्या या हलगर्जीपणाबद्दल या विमानातील प्रवाशांनी नुकसान भरपाई म्हणून ३० लाख रुपये आणि १०० अपग्रेड व्हाऊचर्स मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


प्रवाशांची काळजी न घेण्याचा आरोप

जेट एअरवेजने विमानातील प्रवाशांसाठी सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात, त्यांची काळजी घेण्यात हलगर्जीपणाचा आरोप केला. एवढंच नाही, तर नुकसान भरपाई न दिल्यास उड्डणादरम्यान घडलेल्या सर्व प्रकाराचे व्हिडिओ फुटेज सार्वजनिक करण्याची धमकीही प्रवाशांनी दिल्याचं म्हटलं आहे.


चौकशीचे आदेश

ही घटना घडल्यानंतर त्याच दिवशी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील अहवाल महिन्याभरात येणं अपेक्षित अाहे. एवढंच नव्हे, डीजीसीए (Directorate General of Civil Aviation) देखील या घटनेची चौकशी करत असून चौकशी होईपर्यंत जेट प्रशासनाने विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन आशिष शर्मा, फर्स्ट आॅफिसर अहमर खान यांच्याकडील विमान उड्डाणाची जबाबदारी काढून घेतली आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असंही जेट प्रशासनाने जाहीर केलं आहे.


विमानात नेमकं काय घडलं?

मुंबईहून जयपूरला जाणारं जेट एअरवेजचं ९ डब्ल्यू ६९७ हे विमान गुरूवारी पहाटे ५.५५ वाजता मुंबई विमानतळाहून निघालं. परंतु उड्डाणाच्या काही वेळातच विमानातील वातानुकूलन यंत्रणा बंद झाली. त्यानंतर हवेचा दाब अनियंत्रीत होऊन प्रवाशांना श्वास घेणं कठीण होऊ लागलं. आॅक्सिजन मास्क अचानक खाली आले. परंतु प्रवाशांच्या कानातून-नाकातून रक्त येऊ लागल्याने प्रवासी घाबरले.

जेव्हा ही घटना घडली तेव्हा विमान ताशी ७०० किती वेगाने ११ हजार फूट उंचीवर उडत होतं. त्यानंतर हे विमान तातडीने सिल्वासामार्गे पुन्हा मुंबईला सकाळी ७.१० वाजता उतरवण्यात आलं. श्वसनाचा त्रास झालेल्या प्रवाशांना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. तर प्रकृती गंभीर असलेल्या ५ प्रवाशांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.



हेही वाचा-

जेट एअरवेजचा प्रवाशांच्या जीवावर बेतणारा हलगर्जीणा, ३० प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त

मुंबई-मँचेस्टर विमानसेवा आता आठवड्यातून 5 दिवस



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा