Advertisement

ऐन दिवाळीत मध्य रेल्वे प्रवासी संघटना करणार आंदोलन?

Central Railways had asked for 100 days to resolve the issues regarding its punctuality. As there has been no change in its service after 100 days, the President of a Passengers Union, Nandkumar Deshmukh indicates a possible protest at Azad Maidan

ऐन दिवाळीत मध्य रेल्वे प्रवासी संघटना करणार आंदोलन?
SHARES

मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धक्काबुक्की, लेट मार्क, गैरसोय या सर्व समस्यांची सवय झाली आहे. या मार्गावरील प्रवाशांनी कितीही आंदोलनं, रेल रोको केले तरी त्यांच्या वाटेला निराशाच आली आहे. त्यामागचं कारण म्हणजे मध्य रेल्वे प्रशासनाचा 'ढिसाळ कारभार’. दररोज मध्य रेल्वे मार्गावरून १७७४ लोकल धावतात. परंतु, दिवसाला लोकल धावण्याचं नियोजन केलेलं असतं त्यानुसार लोकल धावत नाहीत. तांत्रिक बिघाड, ओव्हर हेट वायर तुटणं, रेल्वे रुळाला तडा जाणं अशा अनेक घटनांमुळं २५ ते ३० गाड्या रद्द करण्यात येतात. त्यामुळं स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी जमते, परिणामी प्रवाशांना धक्कबुक्की करत रेल्वे प्रवास करावा लागतो.

प्रवाशांना दररोज सामोरं जावं लागणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेच्या प्रवासी संघटनेना आणि प्रवाशांनी अनेकदा आंदोलन केली. मात्र. या आंदोलनाचा मध्य रेल्वे प्रशासनावर काहीही फरक पडला नाही, उलट प्रवाशांनाच अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्याशिवाय, उन्हाळा असो... पावसाळा असो किंवा हिवाळा असो... या तिन्ही ऋतूंत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होते. कारण उन्हाळ्यात रेल्वे रुळ प्रसरण पावतात, थंडीत आकुंचन पावतात पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी तुंबतं. यामुळं प्रवाशांना वर्षाचे बाराही महिने मध्य रेल्वेच्या विस्कळीत होण्याला सामोरं जाव लागतं.

प्रवाशांच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन आणि मुंबई उपनगरीय मार्गावरील १५ प्रवासी संघटना यांच्यात २६ जून रोजी बैठक झाली होती. ही बैठक तब्बल ३.३० तास चालली होती. या बैठकीत मध्य रेल्वेनं मुंबई उपनगरी लोकल पूर्णपणे वेळेवर धावण्यासाठी आणि प्रवाशांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी किमान १०० दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याचं म्हटलं होतं. त्याचप्रमाणं या बैठकीमध्ये मध्य रेल्वे प्रशासनानं मान्सून तयारी, उन्हाळी विशेष मेल, एक्स्प्रेस आणि तांत्रिक बिघाडामुळं मध्य रेल्वे उशीरानं चालविण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण प्रवासी संघटनेला दिलं होतं.

मध्य रेल्वेनं प्रवासी संघटनांना दिलेल्या अल्टिमेटमनुसार शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी १०० दिवस पूर्ण झाले. मात्र, मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप विस्कळीत आहे. त्याशिवाय यंदाच्या पावसाळ्यात दरवर्षीप्रमाणं रेल्वे रुळांवर पाणी तुंबलं होतं. त्यामुळं या १०० दिवसांच्या अल्टिमेटममध्ये मध्य रेल्वेनं सुविधेत सुणारणा केल्याचं दिसत नाही. त्यामुळं आता प्रवासी संघटनांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघाचे (महासंघ) अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना माहिती दिली.

या आंदोलनादरम्यान सीएसएमटी येथील आझाद मैदानात पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. तसंच, मध्य रेल्वेच्या कारभाराबाबत ४ पानी पत्र या प्रवासी संघटनेनं कलेक्टर, पोलीस कमिशनर, रेल्वे मंत्री, चेअरमन, डी.आर.एम. आणि मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. दरम्यान, ४ ऑक्टोबरला १०० दिवस पूर्ण झाले असले अद्याप प्रवासी संघटनांना आंदोलन करता येत नाही. कारण राज्यभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळं प्रवासी संघटनांना आंदोलन करता येत नाही आहे.

परंतु, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघाचे (महासंघ) अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीनंतर आंदोलन करण्यार असल्याचं म्हटलं. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर हे आंदोलन होणार असल्यामुळं प्रवाशांवर या आंदोलनाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, या आंदोलनानंतरही मध्य रेल्वे प्रशासनानं सुविधेत सुधारणा आणली नाही तर, प्रवासी संघटनेनं रेल रोको करण्याचा इशारा दिला आहे.हेही वाचा -

करणी सेनेच्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर बंदोबस्तात वाढ

विदेशी चलनाच्या तस्करीप्रकरणी केनियन महिलेला अटकRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा