Advertisement

रेल्वे स्थानकांवर बसवणार प्लास्टिक क्रशिंग मशीन


रेल्वे स्थानकांवर बसवणार प्लास्टिक क्रशिंग मशीन
SHARES

प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर सरकारकडून प्लास्टिक गोळा करून त्याचा पुर्नवापर करण्याचा प्रयत्न केला जात अाहे. यासाठीच आता मुंबईमधील रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन बसवण्यात येणार आहेत.


६० मशीन बसवणार

पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांमध्ये मिळून एकूण ६० मशीन बसवण्यात येणार अाहेत. सुरूवातीला मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादर, घाटकोपर, कुर्ला, मुलुंड, ठाणे यांसह १७ स्थानकांवर प्रत्येकी दोन मशीन बसवण्यात येतील. तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, मुंबई सेंट्रल, चर्नी रोड, खार, दादर, विलेपार्ले, अंधेरी आणि बोरिवली यासह २५ स्थानकांवर प्रत्येकी १ मशीन बसवली जाईल.


या ठिकाणी असतील मशीन

स्थानकावर असलेल्या फूड स्टॉलला लागूनच या मशीन बसवण्यात येतील. जेणेकरून पाणी पिल्यानंतर लगेच ती बाटली ग्राहकांना त्या मशीनमध्ये टाकता येईल. याचा रेल्वेला आणि स्थानकावर असलेल्या पाणी विकणाऱ्या रेल नीर या कंपनीलासुद्धा फायदा होईल. रेल नीर हे केवळ स्थानकावरच प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी विकू शकते.


चांगला प्रतिसाद

काही दिवसांपूर्वी भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम काॅर्पोरेशनकडून (आयआरसीटी) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,  मुंबई सेंट्रल आणि चर्चगेट या स्थानकांवर प्रायोगिक तत्वावर अशा मशीन बसविण्यात आल्या होत्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये अजून सुधारणा करून आता या मशीन इतर स्थानकांवर बसविण्यात येणार आहे.



हेही वाचा - 

एल्फिन्स्टनचा नवा पूल ३० जूनपासून सेवेत

उडाण ठप्प! कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ३ दिवसांपासून बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा