Advertisement

दिवाळीला गावी जाण्यासाठी विना पैसे देता बुक करा तिकीट, पण...

आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडनं प्रवाशांसाठी पैसे न भरताही तिकीट बुक करण्याची सोय सुरू केली आहे.

दिवाळीला गावी जाण्यासाठी विना पैसे देता बुक करा तिकीट, पण...
SHARES

दिवाळी आणि छट पुजेच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुम्हाला प्रवास करायचा आहे पण तुमच्याकडे पैसे नाहीत तर काळजी करू नका. कारण आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडनं प्रवाशांसाठी पैसे न भरताही तिकीट बुक करण्याची सोय सुरू केली आहे

काय आहे संकल्पना?

तुम्ही पैसे न देता IRCTC द्वारे तिकीट बुक करू शकणार आहात पण या तिकीटाची रक्कम तुम्हाला १४ दिवसांच्या आत भरावी लागणार आहे. पैसे न देता तिकीट खरेदी करण्यासाठी तुम्हाला अर्थशास्त्र प्रायव्हेट लिमिटेडचं प्रोजेक्ट ePayLater मदत करतं. याच्या मदतीनं तुम्ही ट्रेनचं तिकिट खरेदी करू शकता आणि १४ दिवसांत पैसे जमा करून ते भरू शकता.

EpayLater योजनेचे नियम

ePayLater या योजनेंतर्गत ग्राहक IRCTC च्या वेबसाइटवरुन कोणत्याही पेमेंटशिवाय ऑनलाइन तिकीट बुकिंग करू शकतात. या सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांनी पेमेंट करताना ३.५ टक्के सर्विस चार्ज द्यावा लागणार आहे. जर तुम्ही १४ दिवसांनंतर पेमेंट केलं तर तुम्हाला यावर अतिरिक्त व्याजही द्यावा लागू शकतो.

कसं कराल बुकिंग?

तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या अकाऊंटवर लॉगइन करावं लागेल. त्यानंतर तिकीट बुक करण्यासाठी विचारण्यात येणारी माहिती भरावी लागेल. हे भरल्यानंतरच तुम्ही पुढच्या पेजवर जाऊ शकता. यासोबतच ePayLater या अॅपवर तुम्हाला नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर तुमच्यासमोर पैसे भरण्याचा पर्याय येईल. त्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर पैसे भरण्यासंदर्भात माहिती द्यायची आहे. जसं की पैसे कधी भरणार वगैरे. यासाठी तिकीटाची रक्कम विशिष्ट मर्यादेतच असेल.

पैसे न भरल्यास?

जर तुम्ही पैसे वेळेवर न भरल्यास तुमचे क्रेडिट कमी होईल. पुढे तुम्हाला या सेवेचा लाभ घेता येणार नाही. तरी देखील तुम्ही पैसे भरले नाहीत तर तुमचे आयआरसीटीसी अकाऊंट बंद करण्यात येईल.  



हेही वाचा

फॅन्सी नंबर प्लेट पडणार महाग, आता दंड नाही तर होणार 'ही' शिक्षा

मोटरमनने वाचवले तरूणाचे प्राण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा