Advertisement

महिन्याभरापूर्वीच ठरलं, रेल्वेला द्यायचा दणका!!

भुसावळ, धुळे, जळगावसहित ठिकठिकणाहून हे प्रशिक्षणार्थी मुंबईत आंदोलनासाठी एकवटले होते. परंतु या रेल रोकोची किंचीतशी खबरही रेल्वे किंवा पोलिस प्रशासनाला नव्हती. या आंदोलनासाठी विद्यार्थ्यांनी एक महिना आधीपासून प्लानिंग केल्याची माहिती पुढे येत आहे.

महिन्याभरापूर्वीच ठरलं, रेल्वेला द्यायचा दणका!!
SHARES

भरतीतील आरक्षण वाढवून देण्याच्या मागणीसाठी रेल्वे अॅप्रेंटिसच्या प्रशिक्षणार्थींनी मंगळवारी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर उतरत रेलरोको केला. रेल्वेने लिहित आश्वासन देण्याचं मान्य केल्यावरच या प्रशिक्षणार्थींनी तब्बल साडेतीन ते ४ तासानंतर आपलं आंदोलन मागे घेतलं. भुसावळ, धुळे, जळगावसहित ठिकठिकणाहून हे प्रशिक्षणार्थी मुंबईत आंदोलनासाठी एकवटले होते. परंतु या रेल रोकोची किंचीतशी खबरही रेल्वे किंवा पोलिस प्रशासनाला नव्हती. या आंदोलनासाठी विद्यार्थ्यांनी एक महिना आधीपासून प्लानिंग केल्याची माहिती पुढे येत आहे.


लिहिलं होतं पत्र

प्रशिक्षणार्थींनी या आंदोलनाबाबत रेल्वेच्या १६ विभागाचे अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे कळवलं होतं. मात्र त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने हे टोकाचं पाऊल उचलावं लागल्याचं आंदोलनकर्त्यांकडून सांगितलं जात आहे. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आंदोलन मागे घेतलं.



३ वर्षांपासून लढा

रेल्वेमध्ये अॅप्रेंटिस अर्थात प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 'वन टाइम सेटलमेन्ट' पद्धतीने रेल्वेत नोकरी मिळावी यासाठी प्रशिक्षणार्थी मागील ३ वर्षांपासून लढा देत आहेत. दिल्लीत देखील या प्रशिक्षणार्थींनी आंदोलन करून सरकारचं लक्ष आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकार दरबारी त्यांचं केंवळ लाठ्याकाठ्यांनी स्वागत झालं.


महिन्याभरापासून संपर्कात

त्यामुळे सरकारला धारेवर धरण्यासाठी हे विद्यार्थी मागील एक महिन्यापासून एकमेकांच्या संपर्कात होते. या आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यासाठी निवडक विद्यार्थी प्रत्येक तालुक्यात जाऊन विद्यार्थ्यांना भेटत होते. दिल्लीत आलेल्या आंदोलनाच्या अनुभवामुळे हे सर्व आंदोलन गुप्त पद्धतीने करण्याचं त्यांनी पूर्वी ठरवलं होतं.


१५ दिवसांपूर्वीच दिला इशारा

त्यानंतर १५ दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांकडून आपल्या मागण्याचं लेखी पत्र रेल्वेच्या १७ झोनच्या जीएम व मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं. या पत्रात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असं लिहिलं होतं. मात्र या पत्रात तारीख आणि वेळ लिहिलेली नव्हती.


म्हणून दादरची निवड

मात्र मुख्यमंत्री आणि रेल्वेच्या १७ झोनच्या जीएम यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केल्याने ३ दिवसांपूर्वी व्हाॅट्स अॅपच्या माध्यमातून सर्वांना २० मार्च ही आंदोलनाची तारीख असल्याचं कळवण्यात आलं. राज्याबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना दादरवर उतरणं सोपं जाणार असल्याने दादर हेच आंदोलनाचं स्थळ ठरलं. त्यानुसार मंगळवारी सकाळीच राज्यभरातून आलेल्या हजारो विद्यार्थींनी दादर आणि माटुंगा रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल रोको केल्याची कबुली रेल रोको करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिली.



हेही वाचा-

रेल्वे प्रशिक्षणार्थींना मनसेची साथ, शिष्टमंडळ दिल्लीला जाणार

म्हणून, प्रशिक्षणार्थींवर केला लाठीचार्ज- मुख्यमंत्री



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा