Advertisement

रेल्वेच्या जम्बो पंख्यांवर मुंबईकर खूश


रेल्वेच्या जम्बो पंख्यांवर मुंबईकर खूश
SHARES

उकाड्याने त्रस्त प्रवाशांना दिलासा देण्यासोबतच वीजेची बचत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उन्हाळ्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर २४ फुटांचे ५ जम्बो पंखे बसवले. या पंख्यांनी घाम गाळणाऱ्या प्रवाशांना गारवा तर दिलाच, पण पावसात भिजलेल्या प्रवाशांना झटपट सुकवण्यातही हे पंखे उपयुक्त ठरत असल्याने या पंख्यांवर सध्या प्रवासी खूश आहेत.



५ नवे पंखे

एका पंख्याखाली किमान ५० ते ६० प्रवासी उभे राहून हवा घेताना दिसतात. या पंख्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर २४ फुटांचे प्रत्येकी ५ नवीन पंखे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य व पश्चिम लोकल रेल्वे मार्गासोबतच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी टर्मिनसवर मेल-एक्स्प्रेस गाड्यांची वाट पाहत दिवसाला लाखो प्रवासी उभे असतात. या प्रवाशांच्या सोईसाठी महत्त्वांच्या स्थानकांवर 'जम्बो पंखे' बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.



मोठी बचत

'हाय व्हॉल्युम अँड लो स्पीड' (एचव्हीएलएस) नावाने हे पंखे ओळखले जातात. मध्य रेल्वे मार्गावर पहिला पंखा सीएसटी स्थानकात बसवण्यात आला होता. प्रवाशांनी या पंख्याबाबत चांगल्या प्रतिक्रिया नोंदवल्यानंतर स्थानकातील २४ छोटे पंखे काढून त्याजागी ५ जम्बो पंखे बसवण्यात आले.

तर, पश्चिम रेल्वे मार्गावर पहिला पंखा मुंबई सेंट्रल स्थानकात बसविण्यात आला. सुमारे ४.२५ लाख एवढी किंमत असलेल्या या पंख्याची हवा २० मिटर परिसरात खेळती राहते.

त्याचप्रमाणे या पंख्यांमुळे वर्षाला ३ लाख ३ हजार ४५२ रुपयांच्या उर्जेची बचत होते. पश्चिम रेल्वेला आर्थिकदृष्ट्या देखील हे पंखे फायदेशीर ठरत आहेत. ५ नव्या पंख्यांमुळे आणखी पैशांची बचत होणार आहे.


मध्य, पश्चिम रेल्वे स्थानकावरील पंखे :


स्थानक
संख्या
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
मुंबई सेंट्रल

अंधेरी

राममंदिर

बोरीवली




हे देखील वाचा - 

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या 'या' स्पेशल गाड्या!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा