एल्फिन्स्टन पूल दुर्घटना: मरेच्या ६ तर, परेच्या ४ पुलांचं ऑडिट

  Diva
  एल्फिन्स्टन पूल दुर्घटना: मरेच्या ६ तर, परेच्या ४ पुलांचं ऑडिट
  मुंबई  -  

  एल्फिन्स्टन रेल्वे स्थानक पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा बळी गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी तत्काळ बैठक घेऊन मुंबईतील १२२ रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. या ऑडिटला मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली.


  कुठली स्थानकं?

  मंगळवारी पश्चिमच्या ४ आणि मध्य रेल्वेच्या ६ स्थानकांवरील पादचारी पुलांचं ऑडिट करण्यात आलं. यांत मध्य रेल्वेवरील करीरोड, ठाणे, कळवा, ठाकुर्ली आणि दिवा तर पश्चिम रेल्वेवरील विरार, नालासोपारा, वसई रोड, नायगाव स्थानकाचं रेल्वे प्रशासनाकडून ऑडिट करण्यात आलं.


  कुणाचा समावेश?

  दिवा स्थानकापासून या ऑडिटला सुरुवात झाली. हा आढावा घेताना रेल्वेशी संबंधित विविध विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. रेल्वेमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे विविध महापालिका, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आदींचा या पथकात समावेश आहे. तर, रेल्वेतून इंजिनीअरिंग, वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेली पथके तयार करण्यात आली आहेत.


  काय पाहिलं?

  यावेळी स्थानकांवरील स्थिती, पादचारी पूल, चढउतार करताना प्रवाशांची होणारी कुंचबणा, स्कायवॉकची उपयुक्त्ता, प्रवेशद्वाराकडील स्थिती, स्थानकांशी जोडलेले रस्ते, तिथल्या अडचणींची पाहणी करण्यात आली. गरज असेल तेथे चित्रिकरणही केले जाईल.


  आठवड्याभरात अहवाल

  या पाहणीसाठी पश्चिम रेल्वेने ५ तर, मध्य रेल्वेने ८ पथके नेमली आहेत. ५ ते ७ दिवसांत त्याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे.


  उपसमिती नेमण्याचा निर्णय

  एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना भविष्यात घडू नये, यासाठी उपाययोजना करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  हेही वाचा -

  हँकाॅक ब्रिजच्या जागी तात्पुरता पूल बांधा - उच्च न्यायालय

  भायखळा मार्केट पूल कधी बनणार?  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.