प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस सज्ज

 Milan Subway
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस सज्ज
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस सज्ज
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस सज्ज
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस सज्ज
See all

सातांक्रुझ - रेल्वे रुळावर पडणारे तडे, रॉड सापडल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वे पोलीस आता सज्ज झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर उपनिरीक्षक खरमाटे यांनी मिलन सबवेजवळील सेवानगर येथील झोपडपट्टीतील रहिवाशांची भेट घेतली. 

यावेळी त्यांनी रेल्वे रुळावर रॉड सापडणे असे संशयास्पद प्रकार परत घडू नये यासाठी तुम्ही सावधानता बाळगा असं झोपडपट्टीतील रहिवाशांना सांगितलं. तसेच होळीच्या काळात आजूबाजूच्या झोपडपट्टीतून फुगे मारले जातात ज्यामुळे अनेकदा प्रवासी जखमी झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे असे प्रकार टाळा असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच संशयित व्यक्ती आढळल्यास ९८३३३३११११ या हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी रहिवाशांना केले.

Loading Comments