Advertisement

सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेसचे 2 स्लीपर कोच काढून एसी कोच लावले जाणार

मध्य रेल्वेचा एसी कोच लावण्याचा निर्णय मात्र प्रवाशांमध्ये नाराजीचे सूर, वाचा सविस्तर माहिती

सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेसचे 2 स्लीपर कोच काढून एसी कोच लावले जाणार
SHARES

रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) ट्रेनमधील स्लीपर कोच काढून त्याजागी इकॉनॉमिकल क्लासचा (Economical Class)एसी कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एसी कोचचे भाडे स्लीपर कोचच्या(Sleeper coach) तुलनेत महाग आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना ते परवडत नाही. तसेच मागणी नसतानाही रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याकारणाने प्रवाशांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.

मध्य रेल्वे (Central Railway) प्रशासनाने सीएसएमटी(CSMT)- हावडा (Howrah) सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेसला एसी कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे. या एक्सप्रेसचे दोन स्लीपर कोच काढून त्याजागी एसी कोच लावण्यात येणार आहेत.

सुट्ट्या आणि सणाच्या दिवसात सीएसएमटी(CSMT)- हावडा (Howrah) सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेसची प्रतिक्षा यादी क्षमतेपेक्षा जास्त असते. तसेच या दिवसात स्लीपर कोचदेखील पूर्ण क्षमतेने भरलेले असतात. अशात स्लीपर कोचची संख्या कमी करणे प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरेल. 

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीप्रमाणे, ट्रेन क्रमांक 12869 सीएसएमटी – हावडा सुपरफास्ट  साप्ताहिक एक्स्प्रेसमध्ये 18 ऑक्टोबरपासून नवीन डबे जोडले जातील. तर ट्रेन क्रमांक 12870 हावडा – सीएसएमटी सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेसला 20 ऑक्टोबरपासून नवीन डबे जोडले जातील. 

सुधारित रचनेनुसार, ट्रेनमध्ये  चार इकनॉमी कोच, पाच स्लीपर कोच, तीन सामान्य द्वितीय श्रेणी यासह एक गार्ड ब्रेक व्हॅन, एक वातानुकूलित पँट्री कार(Pantry Car) आणि एक जनरेटर व्हॅन (Generater Van)असे मिळून 22 एलएचबी(LHB) कोच असतील. दोन स्लीपर कोच रद्द करून, एक वातानुकूलित तृतीय श्रेणी डबा आणि वातानुकूलित प्रथम श्रेणीचा डबा जोडण्यात आला आहे. सुधारित रचनेनुसार प्रवासी ऑक्टोबर महिन्यानंतर तिकीट खरेदी करू शकतात.हेही वाचा 

कल्याण-कर्जत-कसारा रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याचे 'नो टेंशन'

लोकल ट्रेन्सवर डिजिटल डिस्प्लेची सोय, प्रवाशांना काय फायदा?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा