Advertisement

रेल्वे तिकीटांवरही मराठीचा बोलबाला! स्थानकांची नावं मराठीत!

रेल्वे तिकीटांवर स्थानिक भाषांना प्राधान्य देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानुसार हा बदल करण्यात येणार आहे. सध्या मुंबई उपनगरीय रेल्वेची तिकिटे आणि पासवर तसंच अनारक्षित गाड्यांच्या तिकिटांवर स्थानकांची नावे ही हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहेत. आता मराठीतही नावं असणार आहे.

रेल्वे तिकीटांवरही मराठीचा बोलबाला! स्थानकांची नावं मराठीत!
SHARES

स्थानकांवरच्या नावांच्या मराठीकरणानंतर आता रेल्वे तिकीटांवरची स्थानकांची नावंही मराठीत दिसणार आहेत. येत्या १ मेपासून रेल्वे तिकीटांवर हा बदल दिसणार आहे. रेल्वे तिकीटांवर स्थानिक भाषांना प्राधान्य देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानुसार हा बदल करण्यात येणार आहे. सध्या मुंबई उपनगरीय रेल्वेची तिकिटे आणि पासवर तसंच अनारक्षित गाड्यांच्या तिकिटांवर स्थानकांची नावे ही हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहेत. आता मराठीतही नावं असणार आहे.


लांब पल्ल्याच्या गाड्यांचाही समावेश

केंद्र सरकारच्या धोरणानुसार, रेल्वे स्थानकातून तिकीट काढल्यास तिकिटावर सुरुवातीच्या आणि शेवटच्या स्थानकांची नावे मराठीत छापली जाणार आहेत. यावर रेल्वेच्या क्रिसकडून (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम) काम सुरू असून १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या अनारक्षित तिकिटावर मराठीत स्थानकाचं नाव देण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.


मराठीतील नाव तिसरे

रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातून काढण्यात येणारे लोकलचे तिकीट असो वा पास किंवा महाराष्ट्रातील अन्य स्थानकातून काढण्यात येणारे रेल्वेचे अनारक्षित तिकीटही असेल तरीही त्यावरील स्थानकाचे नाव मराठीत छापले जाणार आहे. मात्र, तिकिटावरी स्थानकाचे मराठीत नाव हे तिसरे असेल.



हेही वाचा

मध्य रेल्वेने शुटींगमधून कमावले १ कोटी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा