Advertisement

मध्य रेल्वेने शुटींगमधून कमावले १ कोटी

मध्य रेल्वेने सिनेमा, जाहिरात आणि मालिकांच्या चित्रीकरणातून कोट्यवधी रुपयाची कमाई केली आहे. या चालू वर्षात म्हणजेच २०१८-१९ मध्ये छायाचित्रीकरणातून मध्य रेल्वेने १ कोटी ८७ हजार ९६० रुपये कमावले आहेत. २०१७ सालच्या कमाईपेक्षा ही रक्कम २६ हजार रुपयांनी वाढली आहे. २०१७-१८ मध्ये मध्य रेल्वेला केवळ ७४ लाख रुपये चित्रीकरणातून मिळाले होते.

मध्य रेल्वेने शुटींगमधून कमावले १ कोटी
SHARES

मुंबईकरांची लाइफ लाइन अशी ओळख असलेल्या मुंबई लोकलची बॉलिवूडमध्ये देखील आगळीवेगळी ओळख आहे. सिनेमा रिअलिस्टीक बनवण्यासाठी प्लॅटफाॅर्म आणि ट्रेनमध्ये शुटींग करण्याकडे सिनेदिग्दर्शकांचा कल असल्याने त्याचा फायदा रेल्वेलाही होऊ लागला आहे. त्यामुळेच चालू वर्षांत मध्य रेल्वेने सिनेमाच्या शुटींगमधून १ कोटी रुपयांहून जास्त उत्पन्न मिळवलं आहे.

कमाईची आकडेवारी

मध्य रेल्वेने सिनेमा, जाहिरात आणि मालिकांच्या चित्रीकरणातून कोट्यवधी रुपयाची कमाई केली आहे. या चालू वर्षात म्हणजेच २०१८-१९ मध्ये छायाचित्रीकरणातून मध्य रेल्वेने १ कोटी ८७ हजार ९६० रुपये कमावले आहेत. २०१७ सालच्या कमाईपेक्षा ही रक्कम २६ हजार रुपयांनी वाढली आहे. २०१७-१८ मध्ये मध्य रेल्वेला केवळ ७४ लाख रुपये चित्रीकरणातून मिळाले होते.

शुटींग लोकेशन

सिनेमाचं शुटींग अनेकदा रेल्वे स्थानकांवर करण्यात येतं. यामध्ये मध्य रेल्वेवरील चित्रीकरणासाठी सर्वाधिक पसंती वाडीबंदर यार्डला मिळाली आहे. गेल्यावर्षी या यार्डमध्ये सिनेमा आणि जाहिरातींसाठी तब्बल १५ वेळा चित्रीकरण करण्यात आलं आहे.

हेही वाचा-

उन्हाळ्यात फिरायला जाताय? मग तुमच्यासाठी खूशखबर

माथेरान स्थानक झालं हरीत स्थानक!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा