Advertisement

आधी बिल घ्या, नंतर पैसे द्या, रेल्वेचं प्रवाशांना आवाहन


आधी बिल घ्या, नंतर पैसे द्या, रेल्वेचं प्रवाशांना आवाहन
SHARES

लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये प्रवाशांच्या खाण्या-पिण्याच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून खान-पान सुविधा पुरवली जाते. मात्र या सेवेअतंर्गत ग्राहकांना पुरवण्यात येणारे खाद्यपदार्थ हे मुळ किंमतीपेक्षा अधिक किंमतीने विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची दखल घेत अन्नपदार्थ विक्रेत्यांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी आता पश्चिम रेल्वेनं पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेनं यासाठी एक जनजागृती अभियान हाती घेतलं आहे. त्याअंतर्गत पश्चिम रेल्वेकडून 'आधी बिल घ्या, नंतर पैसे द्या' असं आवाहन प्रवाशांना करण्यात येत आहे. तर बुधवारी रेल्वेनं या मोहिमेअंतर्गत पश्चिम रेल्वेवरील विविध स्थानकांवरील प्रवाशांना बिलाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.


अन्यथा रेल्वेकडे तक्रार करा


रेल्वे स्थानकांसह रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वेकडून प्रवाशांना खाणपान सेवा पुरवली जाते. पण ही सेवा देणाऱ्या पुरवठादारांकडून-विक्रेत्यांकडून अधिक दर आकारले जातात, ग्राहकांचा खिसा कापला जातो. त्यामुळे रेल्वेनं आता सर्व खान-पान पुरवठादारांना-विक्रेत्यांना खाद्यपदार्थ विक्रीचं बिल ग्राहकांना देणं बंधनकारक केलं असून तशा सूचनाही दिल्या आहेत. तर बिलाची प्रक्रिया वेगवान करण्याकरिता मुंबईत विभागातील ३७४ खाणपान पुरवठादारांना संगणकीकृत बिल मशिन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना बिलं घ्याव, त्यानंतर पैसे द्यावे आणि अधिकची किंमत आकारली गेल्याचं लक्षात आल्यास त्या विरोधात रेल्वेकडे तक्रार करा असं आवाहन पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी केलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा