स्थानकांतील सुरक्षा आराखडा अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत

रेल्वे स्थानकांतील आपघातांना आळा घालण्यासाठी, रेल्वे स्थानकांतील वाढत्या गर्दीचं व्यवस्थापन आणि प्रवासी सुरक्षेसाठी आराखडा तयार करण्यात आला होता

SHARE

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रवासी संख्या वाढ असल्यानं रेल्वे स्थानकासह (Railway Stations) लोकलमध्येही (Local) प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीमुळं अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा (Accidents) लागला आहे. त्यामुळं या आपघातांना आळा घालण्यासाठी, रेल्वे स्थानकांतील वाढत्या गर्दीचं व्यवस्थापन आणि प्रवासी सुरक्षेसाठी आराखडा (Security plan) तयार करण्यात आला होता. परंतु, अद्याप हा आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), कुर्ला (Kurla) आणि दादर (Dadar) या स्थानकांतील सुरक्षा आराखड्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

गतवर्षातील ऑक्टोबर २०१९मध्ये हा आराखडा मंजुरीसाठी मध्य रेल्वेकडे (Central Railway) सुपूर्द करण्यात आला होता. रेल्वे स्थानकांतील प्रवाशांची ये-जा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV), डोअर मेटल डिटेक्टेर (Door metal detector) या आणि अन्य सुरक्षा साधनांचा समावेश असलेला स्थानक सुरक्षा आराखडा (Security plan) मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलानं (RPF) तयार केला. पहिल्या टप्प्यात ६ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांसाठी हा आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, कुर्ला या रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला.

हेही वाचा - खुशखबर! सफाई कर्मचा-यांसाठी १६ हजार घरे देणार - धनंजय मुंडे

लोकमान्य टिळक टर्मिनससह कुर्ला आणि दादर स्थानकांतील सुरक्षा आराखड्यावर विविध विभागांतील रेल्वे अधिकाऱ्यांनी हरकती नोंदवल्या आहेत. त्यामुळं प्रत्यक्ष स्थानकांवर जाऊन पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर या आराखड्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजतं.

हेही वाचा - ३ रुग्णालयांचा बदलणार चेहरामोहरा, पालिकेकडून २७५ कोटींचा खर्च

सीएसएमटी, ठाणे आणि कल्याण स्थानकांचा स्थानक सुरक्षा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यांची अंमलबजवणीच्या कामाला सुरूवाक करण्यात आली आहे. तसंच, मार्चअखेर या तिन्ही स्थानकांतील कामं पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मध्य रेल्वे कटिबद्ध आहे. स्थानक सुरक्षा आराखडा या योजनेबाबत रेल्वे अधिकाऱ्यांच्या आगामी बैठकीत योग्य निर्णय घेण्यात येणार आहे.हेही वाचा -

मेट्रोच्या पासधारकांसाठी अमर्यादित प्रवासाची सुविधा

मनसेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमासंबंधित विषय
ताज्या बातम्या