Advertisement

रेल्वेतल्या गुंड महिलांना चाप बसणार


रेल्वेतल्या गुंड महिलांना चाप बसणार
SHARES

मुंबई - लोकलच्या महिलांच्या डब्यात दिवसेंदिवस वाढणारी वादावादी, खिडकीजवळच्या सीटसाठी होणारी भांडणं, चढता-उतरताना होणारे वाद हे काही मुंबईकरांसाठी नवीन नाही. पण आता महिला डब्ब्यातील काही महिलांच्या गुंडागर्दीला चाप बसणार आहे. रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) विशेष पथक नेमले आहे. या डब्यांमध्ये माहिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून महिला डब्यांमध्ये महिलांच्या चार विशेष टीम बनवण्यात आल्या आहेत. एक पथक सायंकाळी महिलांच्या डब्यातून साध्या वेशात प्रवास करणार आहे आणि महिला डब्यात वाद घालणाऱ्या महिला प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे.

गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर महिला डब्यांमध्ये रोजचे वाद सुरू असल्याच्या तक्रारी आरपीएफला मिळाल्या आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी डाऊन मार्गावर आरपीएफ महिला सुरक्षा रक्षकांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. वाद घालणाऱ्या महिला प्रवाशांवर कारवाई करणार असल्याचे आरपीएफकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


“रेल्वे डब्यात डोअर ब्लॉकर्सचे प्रमाण वाढले आहे. त्यांना लगाम घलणे गरजेचे आहे. कारण डब्यात प्रवास करू न देणे, शिवीगाळ करणे अशा प्रकारच्या घटना महिला डब्यात घडत आहेत. मध्य रेल्वेवर डोंबिवली आणि पश्चिम रेल्वेवर नालासोपारा स्थानकात देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. कारण अनेक वेळा प्रत्येक गाडीत ग्रुप केले जातात अणि प्रत्येक गाडीत जागा अडवल्या जातात." 

"महिलांचा ग्रुप सीएसटीपासून ते कल्याणपर्यंत प्रवास करणाऱ्या असतात. त्याचा त्रास इतर प्रवाशांना होत असतो. हे थाबंणं गरजेचं आहे. मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे प्रवासी महिला संघटनेचे सदस्य स्वागत करतो," असे महिला प्रवासी संघटनेतच्या महिला प्रतिनीधी काजल पगारे यांनी सागितले”

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा