Advertisement

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

परिवहन मंत्री अनिल परब ने इसको घोषणा की

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला १५ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २७ विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यामध्ये ३३ टक्के ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या ‘स्मार्ट कार्ड’ काढण्याची योजना एसटीने  यापूर्वीच सुरू केलेली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा - लॉकडाऊनच्या काळात ओलाची विना वातानुकूलित सेवा

पूर्वीप्रमाणे सवलत लागू

परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणं शक्य नसल्याने तसंच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने सदर योजनेला १५ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यामुळे  ज्या भागात एसटी बस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, असंही परब यांनी सांगितलं. 

विशेष बसची सेवा सुरूच

कोरोना व्हायरसला (coronavirus) आळा घालण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी (curfew in maharashtra) लागू असली, तरी अत्यावश्यक सेवा सुरूच आहेत. शिवाय सर्व सरकारी कार्यालयं देखील कमीत कमी ५ टक्के मनुष्यबळासह चालवण्यात येत आहेत. अशा स्थितीत या कर्मचाऱ्यांना कार्यालयापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे विशेष बस (st bus) चालवण्यात येत आहेत.

मुंबईची लाइफलाईन समजली जाणारी लोकल ट्रेन बंद असल्याने मुंबई शहर आणि उपनगरातील कर्मचाऱ्यांना थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळ ठाणे आणि पालघर विभागातून विशेष एसटी बस चालवत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण, डोंबिवली आणि कळवा तर पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार आणि नालासोपारा इथून मंत्रालय गार्डन गेट इथपर्यंत ही एसटी बस सेवा पुरवण्यात येत आहे. त्याशिवाय मुंबई महापालिकेने एसटी महामंडळाकडून काही बस भाड्याने घेतल्या असून महापालिका कर्मचाऱ्यांसाठी विशेष एसटी चालवण्यात येत आहेत.

हेही वाचा - बेस्टच्या ३ कोरोनाबाधितांची मृत्यू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा