Advertisement

मुंबईतील लोकल प्रवासावर येणार आणखी निर्बंध

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी राज्य सरकाकरनं कंबर कसली आहे.

मुंबईतील लोकल प्रवासावर येणार आणखी निर्बंध
SHARES

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी राज्य सरकाकरनं कंबर कसली आहे. ठिकठिकाणी कोरोना चाचणीला सुरूवात केली असून, लसीकरणाचा वेगही वाढवला आहे. दरम्यान, आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती दिली.

राज्यात करोनाचा प्रादूर्भाव वाढत असला तरी लॉकडाऊनला विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचाही विरोध आहे. त्यामुळं संपूर्ण लॉकडाऊनचा पर्याय मागे पडला आहे. मात्र, निर्बंध अधिकाधिक कठोर करण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करत आहेत. गर्दी होणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळंच मुंबई लोकलबाबत सरकार काय निर्णय घेणार? लोकल पुन्हा बंद होणार का? याविषयी मुंबईकरांच्या मनात धाकधूक आहे.

'मुंबईतील लोकल पूर्णपणे बंद होणार नाही. मात्र, लोकल (Mumbai local) प्रवासावर काही निर्बंध लादले जातील. लोकल प्रवासाचं नियोजन वेगळ्या पद्धतीनं केलं जाईल. गर्दी नियंत्रणात ठेवतानाच लोकांची गैरसोय होणार नाही हे पाहिलं जाईल. मागील वेळी पश्चिम बंगाल व तामिळनाडूमध्ये अशा प्रकारचे नियोजन करण्यात आलं होतं', असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

'करोनाची आताची स्थिती भयंकर आहे. करोनाबाधितांमध्ये यावेळी २५ वर्षे वयाच्या आतील रुग्णांची संख्या जास्त आहे. लहान मुलांपर्यंत करोना पोहोचलाय. सरकारकडून उपाययोजना सुरूच आहेत,' असंही वडेट्टीवार म्हणाले.हेही वाचा -

  1. तेजस एक्स्प्रेस एक महिना राहणार बंद

  2. आता एक्स्प्रेसमध्ये मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग करण्यावर बंदी


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा